माॅल मध्ये अशा युक्त्या वापरतात की तुमचा खिसा खालीच झाला पाहिजे
फेसबुक लिंक https://bit.ly/3k3OKjs
मॉलमध्ये येणाऱ्या प्रत्येकाने त्या मॉलमधून काहीना काही खरेदी करावी यासाठी तेथील व्यापारी नवनवीन शक्कल लढवत असतात.
मॉलमध्ये आल्यावर आपल्या नजरेत भरतील असे फेमस कंपनींचे भलेमोठ्ठे प्रोडक्ट आकर्षक पद्धतीने ठेवलेले असतात. तसेच तुम्हाला ते सहज दिसतील याची विशेष काळजी घेतली जाते. त्याच प्रोडक्टची लहान साइज ही नजरेत बसणार नाही अशी ठेवली असते. ज्या कंपनीचे प्रॉडक्ट कमी किमतीचे किंवा कमी नफ्याचे असते ते शेल्फच्या अगदी खालच्या बाजूला जिथे सहज नजर जाणार नाही अशा ठिकाणी ठेवलेली असते.
यामागे मानसशास्त्रीय कारण आहे. ते असे की, ग्राहक त्यांच्या नजरेच्या टप्प्यात आणि डोळ्यांच्या रेषेत असणाऱ्या गोष्टी पटकन खरेदी करतात. त्या रेषेच्या अगदी वरती वा खाली असणाऱ्या वस्तूंकडे ते सहसा लक्ष देत नाहीत.
तुम्ही मॉलमध्ये, शॉपिंग करण्याच्या ठिकाणी तुम्हाला घड्याळ शोधूनही सापडणार नाही. कारण जर तुम्हाला वेळेचं भान आलं तर तुम्ही आवश्यक वस्तू घेऊन लवकर बाहेर पडाल. शिवाय तेथे खिडक्याही नसतात जेणेकरून आपण खरेदी करता करता बाहेर अंधार पडलाय हे ही आपल्या लक्षात येत नाही.
♦रंगसंगती
एखाद्या प्रोडक्टचा खप वाढवण्यासाठी आकर्षक, सुंदर व सुडौल मॉडेल दाखवले जातातच. पण त्या प्रोडक्टची विक्री करण्याच्या ठिकाणी आकर्षक मांडणी आणि रंगसंगती केली जाते. तुम्ही ज्यावेळी एखादे प्रोडक्ट बघता त्यावेळी तिथे त्या मॉडेलचे पोस्टर तर असतेच पण, तिथे तुम्हाला मुक्तपणे फिरण्यासाठी जागाही सुटसुटीत असते.
आकर्षक रंगसंगती असली की ग्राहक नकळतपणे उत्पादन काय आहे हे बघायला जातात. बरेचदा गरज नसताना ते खरेदीही करतात.
शिवाय तेथे गेल्यावर आपल्या लक्षात येते की, एकतर या पदार्थांची किंमत जास्त असते. दुसरे म्हणजे कमी किमतीचे पदार्थ हे सहसा एक नग उपलब्ध न ठेवता ते कमीतकमी दोन किंवा त्यापेक्षा जास्त घेणे बंधनकारक असते. अशावेळी आपण पोटासाठी काय एवढा विचार करायचा म्हणत किंमत आणि विक्रेत्याच्या चलाखीकडे दुर्लक्ष करत काहीतरी घेतोच
आकर्षक रंगसंगती असली की ग्राहक नकळतपणे उत्पादन काय आहे हे बघायला जातात. बरेचदा गरज नसताना ते खरेदीही करतात.
यामुळे त्या माॅॅलचे ठरवुन दिलेले टार्गेट पुर्ण होते व कंपनीकडून त्याचा मोबदलाही मिळतो. शिवाय वस्तु भरपुर असल्याने तुम्ही मनमोकळे पणाने वापरता, ती लवकर संपवता व परत खरेदी करायला जाता.
वेळेचे भान नसले की, ग्राहक कामाशिवाय जास्त वेळ घालवतो. या नादात आवश्यक नसलेले पदार्थ, वस्तू विकत घेतले जातात. म्हणून इतक्या मोठ्या मॉलमध्ये घड्याळाची व्यवस्था काही केली जात नाही.
तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर लहान मुलांना माॅल मध्ये नेऊ नका. यामुळे अनावश्यक गोष्टी तुम्हाला खरेदी करावी लागेल.