मोराची चिंचोली : 'येथे' माणसांपेक्षा जास्त आहे मोरांचे वास्तव्य...

मोराची चिंचोली : 'येथे' माणसांपेक्षा जास्त आहे मोरांचे वास्तव्य... 

माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 


दि. ९ जानेवारी २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3q42JZD
लहानपणी 'नाच रे मोरा' हे गीत सर्वांनीच गायले असेल. आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी असलेला मोर पिसारा फुलवून नाचताना अधिकच मनमोहक वाटतो. परंतू, आजकाल लहान मुलांना मोराला पुस्तकात किंवा मीडियामध्येच पाहावे लागते. मात्र,महाराष्ट्रात असे एक गाव आहे जे मोरांचे गाव म्हणून ओळखले जाते. शहरातील लोकांना एरवी प्राणिसंग्रहालयात पाहावयास मिळणारे मोर या गावात मुक्तपणे वावरताना दिसतात. त्या गावाचे नाव आहे 'मोराची चिंचोली'..


हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात असलेले मोराची चिंचोली हे गाव मोठ्या प्रमाणात मोर असलेलेगाव आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट, पुण्यापासून दीड तासांच्या अंतरावर शिरुर व शिक्रापूर पासून हे गाव जवळ आहे. १०० ते १५० घरांचे छोटेसे गाव रांजणगाव गणपतीपासून २३ किमी अंतरावर आहे. अनेक वर्षांपूर्वी यागावात मोठ्या प्रमाणात चिंचेची झाडे होती. त्यामुळे या गावाला चिंचोली म्हणून ओळखले जाऊ लागले. आजही जुनी चिंचेची झाडे आहेत. त्यात मोरांची भर पडल्याने हे गाव ‘मोराची चिंचोली’ म्हणून प्रसिद्ध झाले आहे.गावात मोठ्या प्रमाणात मोर पाहायला मिळतात. गावाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त येथे मोर आढळतात. येथील लहान मुलांसाठी ते मित्र असल्यासारखेच वाटतात. सकाळच्यावेळी अंगणात पाहिले तर तुम्हाला मोरच-मोर दिसतील. हा मनमोहक अनुभव घेण्यासाठी पावसाळा आणि हिवाळा हा काळ सर्वोत्तम आहे. तुम्ही या ठिकाणी दोन दिवसांची सहलही करू शकता. मात्र पावसाळ्यात येथे येण्यासाठी बुकिंग करुनच यावे.गावातील अनेक नवीन गोष्टींचा अनुभव तुम्हाला येथे घेता येईल. तुम्ही शहरात राहून कधीच अशा गोष्टी पाहू शकणार नाहीत. फिरायला जाण्यासाठी बैलगाडी किंवा ट्रॅक्टरमधून जावे लागते. येथे खटकली, पाटील मळा, थोरले मळा, महानुभाव वस्ती, खटकली वस्ती ही काही पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.

 

Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने