घडयाळाचा शोध लागण्यापूर्वी लोक वेळेवर कसे उठायचे ?

घडयाळाचा   शोध लागण्यापूर्वी लोक वेळेवर कसे उठायचे ? 




दि. १७ सप्टेंबर  २०१८

फेसबुक लिंक https://bit.ly/33z7JvH
  .         घड्याळ नसते तर आपलं काय झालं असतं देव जाणे ! आता आपल्याकडे  घड्याळ आहे म्हणून आपण रात्री उशिरा देखील निश्चिंत होऊन झोपतो, कारण आपल्याला माहित असतं की सकाळी काही झालं तरी  घडयाऌचा अलार्म हा वेळेवर वाजणार आणि आपल्याला बरोबर जागा करणार. पण कधी विचार केलायं का, घडयाळचा शोध लागण्यापूर्वी लोक कसे काय वेळेवर उठत असतील?
१५ व्या शतकाच्या पूर्वी लोक रात्री झोपायच्या वेळेस एक पेटलेली मेणबत्ती धातूपासून बनलेल्या प्लेटवर ठेवायचे आणि त्या मेणबत्तीवर ठराविक अंतराने खिळे टोचून ठेवलेले असायचे. जेव्हा खिळ्याभोवतालचं मेण वितळायचं तेव्हा तो खिळा धातूच्या प्लेटमध्ये पडायचा आणि मोठा आवाज व्हायचा. त्या आवाजाने झोपलेला माणूस दचकून जागा झालाच पाहिजे.


 आणि समजा कधीकधी त्या आवाजानेही माणूस जागा झाला नाही तर, म्हणूनच हे लोक मेणबत्तीला ठराविक अंतराने ४-५ खिळे टोचून ठेवायचे, म्हणजे कोणत्या तरी एका खिळ्याच्या आवाजाने झोपलेला माणूस जागा होईल. (अलार्म मधील स्नूझ प्रकरणाचं हे प्राचीन रूप)

 

Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने