रेल्वेचे ब्रेक कसे काम करतात ?
माहिती सेवा ग्रूप,
. 📯 दि २० आॅक्टोबंर २०२० 📯
फेसबुक लिंक http://bit.ly/31lTXfE
. लहान मोठे रेल्वेचे अपघात घडत असतात. अनेनजण रेल्वे ट्रॅकवर अपघातात बळी पडतात तेव्हा वाटते रेल्वे थांबत का नाही?, रेल्वेला ब्रेक नसतात का?, ब्रेक असतील तर मग ते कसे काम करतात?, याबद्दल जाणून घेऊयात...
रेल्वेमध्ये एअर ब्रेकचा वापर करतात
रेल्वेमध्ये एअर ब्रेक पद्धत वापरतात. हिच पद्धत अवजड बस किंवा ट्रकमध्ये असते. एअर ब्रेक पद्धतमध्ये ‘कम्प्रेस्ड एअर’च्या (दाब देऊन बसवलेला हवेच्या) माध्यमातून चाकांची गती थांबवली जाते.रेल्वेच्या ब्रेकची काम करण्याची पद्धत
चाकांना थांबवण्यासाठी ‘ब्रेक शु’ चा वापर केला जातो. ‘ब्रेक शु’ चाकांवर दबाव निर्माण करतो ज्यामुळे त्यांची गती कमी होते. यासाठी एका कम्प्रेस्ड एअर असलेल्या नायलॉनच्या पाईपला ‘ब्रेक शु’ बरोबर जोडले जाते. या नायलॉनच्या पाईपमध्ये एअर प्रेशर कमी जास्त केल्याने गाडी थांबते किंवा पुढे सरकते. रेल्वेमध्ये दोन ब्रेक असतात एक म्हणजे इंजिनसाठी आणि दुसरा संपूर्ण रेल्वेसाठी. प्रत्येक डब्याच्या चाकांना ब्रेक बसवलेले असतात. हे सगळे ब्रेक्स ब्रेक पाईपद्वारे एकत्र जोडलेले असतात.आपण वाचत आहात
रेल्वेचा ब्रेक लावण्याची पद्धत
ब्रेक लावण्यासाठी रेल्वेमध्ये एक विशिष्ट ‘ब्रेक लीव्हर’ असतो. हा एक प्रकारचा दांडा असतो ज्याला फिरवल्यानंतर पाईपमधला हवेचा दाब कमी होऊ लागतो आणि ब्रेक शु आवळले जातात. ब्रेक लिव्हर विशिष्ट पद्धतीने फिरवला जातो. एका ठराविक प्रमाणापेक्षा जास्त फिरवल्यानंतर इमर्जन्सी ब्रेक लागतात. आपण जेव्हा रेल्वेची चेन खेचतो तेव्हा खरे तर आपण इमर्जन्सी ब्रेक लावत असतो.रेल्वेचा चालक ब्रेक कधी लावतो?
इतर चालकाप्रमाणे रेल्वेच्या चालकाच्या हातात आपल्या मर्जीप्रमाणे ब्रेक लावण्याचे अधिकार नसतात. यासाठी एक वेगळी पद्धत घालून दिली आहे. समजा एक रेल्वे साधारण १६० किलोमीटर प्रती तासाच्या गतीने धावत आहे आणि रेल्वे चालकाला समोर २ पिवळे सिग्नल दिसले, तर तो लगेच रेल्वेची गती कमी करतो. पुढे जर असे आणखी पिवळे सिग्नल मिळत राहिले तर चालक रेल्वेची गती आणखी कमी करत जातो. पण जेव्हा लाल सिग्नल मिळतो तेव्हा मात्र काहीही करून त्याला रेल्वे थांबवावीच लागते. लाल सिग्नलवर रेल्वे न थांबवणे गंभीर गुन्हा समजला जातो.
📐.....का थांबत नाही रेल्वे ?
यावरुन लक्षात येते की, रेल्वेला ब्रेक लावणे इतके सोपे नाही जेवढे समजतो.संकटकालीन परिस्थितीत म्हणजे रुळ तुटलेला किंवा कोणतरी रुळ पार करत असल्याचे दिसत असेल तर रेल्वे चालकास ब्रेक लावण्याचा अधिकार असतो. जसकी, चालकास रेल्वे रुळावर कोणतरी दिसले व त्याने इमर्जन्सी ब्रेक लावला तर रेल्वे ८०० ते ९०० मीटर पर्यंत जाऊनच थांबेल. म्हणजे जर चालकाला लांबवर कोणीतरी रुळावर दिसले तरच त्याचा जीव वाचविणे शक्य आहे. पण अनेकदा अचानक कोणीतरी रेल्वेच्या समोर येते. अशावेळी चालकाला ब्रेक लावण्यासाठी वेळच मिळत नाही. शिवाय इमर्जन्सी ब्रेक दाबल्याने निर्माण झालेल्या परिस्थिती मुळे गाडी रुळावरून खाली येऊ शकते. गाडीची लांबी हा इथे महत्वाचा भाग असतो.