हे आहेत बिनभांडवली धंदे
________________________________
우 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव 우
________________________________
तारीख 3 एप्रिल 2021
________________________________
फेसबुक लिंक http://bit.ly/31Lfiix
ज्याची वृत्ती, प्रवृत्ती उद्योजकतेची असते त्याला मात्र प्रत्येक ठिकाणी व्यवसायच दिसतात आणि तो त्यातला कोणताही व्यवसाय करण्यास धजावतो. एकदा अशीच एक उद्योजक प्रवृत्तीची व्यक्ती स्वत:ची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी एका डॉक्टरकडे गेली होती. त्याने डॉक्टरकडे जाऊन पाहिले तेव्हा रुग्णांची बरीच मोठी रांग लागलेली दिसली. त्याला रांगेत थांबावे लागले आणि त्याचानंबर लागण्यास पाऊण तास लागला. मात्र तो रांगेतला पाऊण तास तो निवांत बसला नाही. त्याने आजूबाजूला नजर टाकली, काही निरीक्षणे केली आणि काही नोंदी केल्या. त्याचा नंबर लागून तो डॉक्टरसमोर तपासणीसाठी बसला तेव्हा त्याने आधी पाऊण तासभर केलेल्या निरीक्षणाचा कागद त्यांच्यासमोर ठेवला आणि म्हणाल्या, मी गेला पाऊण तास तुमच्या रुग्णालयाचे निरीक्षण केले असून रुग्णालयाशी संबंधित असे किती व्यवसाय करता येतात याच्या नोंदी केल्या आहेत. मला असे आढळले आहे की, एका रुग्णालयाशी संबंधित व्यवसाय करायचेच ठरवले तर साधारणत: ४० व्यवसाय करता येतात असे म्हणत त्याने त्या व्यवसायाची यादी डॉक्टरना वाचून दाखवली. काय करावे, काय धंदा करावे हे सुचतच नाही असे म्हणणार्यांसाठी हा एक चांगला धडा आहे.पुण्यात एका तरुणाने एक छान व्यवसाय शोधून काढला होता. त्याचा एक मित्र श्रीमंत लोकांच्या घरी शोभीवंत पुष्पगुच्छ नेऊन देण्याची सेवा करत असे. तो स्वत:च्या घरी अतीशय कलात्मक पुष्पगुच्छ तयार करायचा आणि लोकांच्या घरी नेऊन द्यायचा.त्यांच्या दिवाणखान्यामध्ये तो पुष्पगुच्छ टेबलवर ठेवला की, घराची शोभा वाढे आणि या पुष्पुगुच्छाच्या सेवेबद्दल त्याला पैसे मिळत. पैसे किती मिळावेत हे गुच्छ बदलण्याच्या वेळेवर अवलंबून असे. काही लोकांना रोज नवा पुष्पगुच्छ लागे,काही जण आठवड्याला एक गुच्छ मागत. त्यानुसार त्याला कमी-जास्त पैसे मिळत असत. त्याचे अनुकरण करून त्याच्या एका मित्राने दिवाणखान्याची शोभा वाढविणारी पोस्टर्स पोचवायला सुरुवात केली.घरात एकच एक पोस्टर लावून तेच रोज बघून लोकांना कंटाळा येतो. तेव्हा या तरुणाने त्यांच्या घरातले पोस्टर बदलण्याचा व्यवसाय सुरू केला.
सध्या महाराष्ट्रात आघाडीचे उद्योगपती म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते ते डी.एस. कुलकर्णी आपल्या उमेदीच्या काळात टेलिस्मेल हा व्यवसाय करत असत. त्यात लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या फोनचा रिसिव्हर पेट्रोलने स्वच्छ साफ करणे आणि जाताना त्यात अत्तराचा फाया ठेवून जाणे हाच तो व्यवसाय. त्यातूनच ते पुढे मोठे उद्योगपतीझाले.आता दिल्लीतल्या एका विद्यार्थ्याने गेले वर्षीच केलेला एक उद्योग किती चांगला आहे बघा. सध्याच्या शिक्षणामध्येप्रॅक्टिकलला खूप महत्व आले आहे आणि आठवी, नववीच्या वर्गापासून तेअभियांत्रिकी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनाच कधी तरी एखादा प्रोजेक्ट सादर करणे हे सक्तीचे झाले आहे. सध्या प्रोजेक्टचे नखरे ङ्गार वाढलेले आहेत. एखादा प्रोजेक्ट सादर करताना तो डी.टी.पी. करून सादर करावा लागतो. शिवाय त्यात काही चित्रे टाकावी लागतात. त्याचे उत्तम स्पायरल बायंडिंग करावे लागते. शिवाय त्याला सजवून, नटवून सादर करावे लागते. अनेकदा त्यात त्यात कसल्या कसल्या माहितीच्या झेरॉक्स प्रती जोडाव्या लागतात. ही सगळी कामे करताना विद्यार्थ्यांच्या नाकी नव येतात. ही कामे परीक्षा जवळ आल्यावरच केली जातात. आधीच परीक्षेचे टेन्शन, त्यात या कामाची घाई अशी परिस्थिती झाली की, विद्यार्थी थकून जातात आणि त्याचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होतो. अशी सगळी ही कामे कोणी आयती करून दिली तर बरी वाटतात. ही संधी शोधून दिल्लीतल्या अजय नावाच्या एका तरुणाने सगळ्या प्रकारच्या विद्याशाखांचे प्रोजेक्ट तयार करून देणे हा व्यवसायच सुरू केला आहे. तसे तर डी.टी.पी. करणारे अनेक लोक अाहेत. सायबर कॅङ्गेतून माहिती काढता येते आणि ङ्गोटो सुद्धा काढता येतात.
बायंडिंग करणारेही अनेक लोक आहेत. परंतु या प्रत्येक कामासाठी या चार दुकानांत ङ्गिरून विद्यार्थ्यांची दमणूक होते. मग ही मुले अजयकडे आपले काम सोपवतात. तो एका प्रोजेक्टमागे साधारण ५००रुपये ते २००० हजार रुपये असा दर लावून त्याची ही सारी कामे करून देतो. त्यामुळे मुलांची पायपीट टळते. या कामाची त्याला एवढी सवय झालेली आहे की, तो आता विद्यार्थ्यांना प्रोजेक्टचे विषय सुद्धा सुचवायला लागला आहे आणि त्या विषयाची माहिती तोच मिळवून द्यायला लागला आहे. शैक्षणिक दृष्ट्या ही गोष्ट चूक आहे, परंतु त्याला अजयचा नाईलाज आहे. त्याला व्यवसाय मिळत आहे. त्याने एक कॉम्प्युटर, झेरॉक्स मशीन, इंटरनेट कनेक्शन, बायंडिंग वर्क असे सगळे एकत्र करून एक प्रोजेक्ट व्यवसायच सुरू केलेला आहे. अन्यथा बेकार राहिला असता तो अजय आता महिन्याला २५ ते ३० हजार रुपये कमावतो आणि त्याने आपल्या सोबतच तिघांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

💖 माहिती सेवा ग्रूप 💖
________________________________
✆ ░9░011714634
________________________________