कोरोनापासुन वाचवण्यासाठी बनवले कोरोना मंदिर
___________________________
माहिती सेवा ग्रूप
___________________________
जगात जेवढी श्रध्दा आहे तेवढीच अंधश्रद्धा पण आहे.१०० वर्षापूर्वी देविचा रोग आला होता.गावोगावी लोक मृत्युमुखी पडत होते.त्यावेळी मरीआईचा गाडा करून लोक दुसर्या गावच्या हद्दीत सोडत होते.मग त्या गावचे लोक तो गाडा पुढील गावात सोडत असत.
त्यावेळी लोक अशिक्षित तरी होते.पण आत्ता शिक्षित लोक असताना देखील अंधश्रद्धा काही हटत नाही.
कोरोना विषाणूच्या महामारीमुळे सध्या संपूर्ण देश चिंतेत आहे.अनेक राज्यांमध्ये अंशतः तर काही राज्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या महामारीपासून वाचण्यासाठी नियमांचं पालन आणि लसीकरण हे दोन महत्त्वाचे पर्याय मानले जात आहेत.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट, एकीकडे शास्त्रज्ज्ञ विज्ञानाच्या मदतीनं महामारीला रोखण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे काही लोक श्रद्धेचा मार्ग अवलंबत कोरोनाला पळवून लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
मागील काही दिवसांपासून देशाच्या वेगवेगळ्या भागांतून कोरोना मातेच्या पुजेबाबतच्या बातम्या समोर येत आहेत.अशात आता तमिळनाडूच्या कोयंबतूर मधूनही अशीच बातमी समोर आली आहे. येथील इरुगुरमधील कमाचीपुरी आदिनाम मंदिरानं कोरोना देवीची मूर्ती बनवण्याचा आणि त्याची पूजा करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, यामुळे लोक कोरोना संसर्गापासून वाचतील.
आदिनाम मंदिरातील व्यवस्थापकांपैकी एक सिवालिनेजेश्वर म्हणाले की, पूर्वी कोलेरा आणि प्लेग सारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी देवीची पूजा केली गेली होती. लोकांना आजारां पासून वाचवण्याची ही परंपरा आहे. यापूर्वी प्लेगसह इतर काही इतर देवी-देवतांची मूर्ती तयार केली गेली होती.
मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येनं रुग्णांचा मृत्यू होत आहे. अशात ग्रेनाइटनं बनलेली कोरोना देवीची मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतकंच नाही तर इथे कोरोनासाठी विशेष पूजा आणि प्रार्थनाही केली जाईल. 48 दिवसांच्या या महायज्ञांदरम्यान सामान्य लोक यात सहभागी होऊ शकणार नाहीत. महायज्ञ पूर्ण झाल्यानंतरच लोक कोरोना देवीचं दर्शन घेऊ शकतील.
माहिती सेवा ग्रूप
9011714634
=====================================