पाल अंगावर पडल्यास का लगेच आंघोळ करावी.?
____________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
____________________________
फेसबुक लिंक http://bit.ly/3njv1zc
पाल हा तसा विचित्र दिसणारा प्राणी. इतर गोष्टीना न घाबरणारी माणसं पालीला मात्र घाबरतात. अत्यंत किळसवाण्या वाटणाऱ्या पालीला पाहिलं तरी अंगावर काटाच उभा राहतो. पाल अंगावर पडली की अंघोळ केली जाते. यामागे नक्की कारण काय?Ⓜ
असं म्हणतात, की पाल जर अंगावर पडली तर लगेच आंघोळ करावी. तिचा स्पर्श जरी झाला तरी अंग स्वच्छ धुवून घ्यावे.
जेव्हा पाल आपल्या अंगावर पडते तेव्हा तिच्या शरीरातील विष ती समोरच्या शरीरावर फेकते.त्यानंतर हे विष छिद्रातून आत शरीरात जाते आणि आत जाऊन त्वचारोग किंवा शारीरिक व्याधीचं कारण बनू शकते. यामुळेच पाल अंगावर पडली तर आंघोळ करावी. काही ठिकाणी पूजाही केली जाते. या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. त्याचं महत्वही तसंच आहे. कारण तुळशीची पाने खाल्ल्याने विषाचा प्रभाव कमी होतो.Ⓜ
____________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
____________________________