गावानां खुर्द आणि बुद्रुक का म्हणतात

 गावानां खुर्द आणि बुद्रुक  का म्हणतात🔹

_________________________

माहिती  सेवा गृप पेठवड़गाव

________________________

खुर्द आणि बुद्रुक :- महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी खुर्द आणि बुद्रुक असे शब्द गावांच्या नावापुढे दिसतात.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=193015087763089&id=100011637976439

 निवे खुर्द किंवा निवे बुद्रुक, तसेच  आंबेगाव खुर्द आणि आंबेगाव बुद्रुक किंवा वडगाव खुर्द आणि वडगाव बुद्रुक अशी दोन दोन गावे शेजारीशेजारी वसलेली दिसतात. तर हा खुर्द आणि बुद्रुक काय प्रकार आहे ? मला पडलेला हा प्रश्न एकदा ऐतिहासिक लिखाण वाचताना सुटला. त्यात असे लिहिले होते – – – –

पूर्वी मुसलमानी अंमल होता तेव्हा उर्दूमिश्रित किंवा फारसी मिश्रित भाषा बोलली किंवा लिहिली जात असे. मोगल किंवा आदिलशाही कुतुबशाही, निजामशाही इत्यादी कालखंडामध्ये मुस्लीम अंमलात खुर्द आणि बुद्रुक हे शब्द वापरले जात. एखाद्या रस्त्यामुळे एका गावाचे दोन भाग पडत असले तर ते दोन भाग समसमान कधीच नसत. एक भाग छोटा तर दुसरा मोठा असे. त्यातील मोठा भाग असलेल्या गावाला बुजुर्ग  आणि छोटा भाग असलेल्या गावाला खुर्द असे म्हणत. बुजुर्ग म्हणजे मोठा आणि खुर्द म्हणजे चिल्लर किंवा छोटा अशा अर्थाने त्या गावाच्या दोन्ही भागांना खुर्द किंवा बुद्रुक असे संबोधले जाई. या ‘बुजुर्ग’चा अपभ्रंश होऊन बुद्रुक हा शब्द तयार झाला आणि ‘खुर्द’चा अपभ्रंश न होता तो तसाच राहिला.♍

Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने