बौद्ध रामायण
फेसबुक लिंक http://bit.ly/3ssxlFf
"बौद्ध रामायण" हे दशरथ जातक या नावाने ओळखले जाते. बौद्ध रामायणही मानवी पातळीवरचे आहे. या रामायणातही राम आणि त्याच्या भावांचा जन्म निसर्ग नियमाने झाला आहे. या रामायणात सीतेची अग्नीपरीक्षा, निष्कासन या गोष्टी नाहीत. बौद्ध रामायणात सीता ही दशरथाची मुलगी अर्थातच रामाची बहिण आहे. दशरथ हा वाराणसीचा राजा आहे. (अयोध्येचा नव्हे ) बौद्ध रामायणातील कथेनुसार दशरथ राम, लक्ष्मण, सीता यांना त्यांच्या सावत्र आईपासून वाचवण्यासाठी हिमालयात पाठवतो (दक्षिणेत नव्हे ). कांही वर्षांनी राम, लक्ष्मण, सीता वाराणसीला परत येतात. मग तेथे राम आणि सीता यांचे लग्न होते. दशरथ जातकात लंकेचा उल्लेख नाही, तसेच रावणाचाही नाही.
वाल्मिकी रामायणाचे मूळ दशरथ जातकात आहे असे अनेक इतिहासकारांचे मत आहे.
थायलंड मध्ये "वाट फ्रा काएव" अर्थात ‘हरित बुद्ध मंदिर’ आहे.हे थायलंडमधील बौद्ध धर्माचे सर्वात प्रतिष्ठित तीर्थ स्थान. राजधानी बँकॉकच्या केंद्र स्थानी असलेल्या या मंदिराजवळच एक शाही महाल आहे.या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे याच्या अवतीभोवती असलेली दोन किमी लांब भिंत. आपल्याकडे बुद्धांना देवाचा अवतार मानले जाते. अनेकांसाठी हे मंदिर आस्थेचा देखील विषय असू शकतो. मात्र मंदिराच्या अवतीभोवती असलेली भिंत आस्थेसोबतच कोणत्याही भारतीयासाठी आश्चर्याचा विषय ठरू शकते. या संपुर्ण भिंतीवर रामायणाच्या कथेतील चित्र आहेत.
(थायलंड- मंदिराच्या भिंतींवर चित्रे)
थायलंड हा तसा बौद्ध बहुल देश. मात्र येथील राजासह जवळपास सर्वच लोक रामाकीन (रामायण) च्या अठराव्या शतकात अस्तित्वात आलेल्या या आवृत्तीला राष्ट्रीय ग्रंथ मानते. या भिंतीवर रेखाटलेली चित्र आणि रंगांची गुणवत्ता उच्च दर्जाची आहे. या माध्यमातून थायलंडमधील प्रचलित रामायण-रामाकीनचे नायक फ्रा राम ची कथा दाखवण्यात आली आहे.18व्या शतकाच्या मध्यमात सियामचे (आजचे थायलंड) शहर अयुत्थया (अयोध्याचा अपभ्रंश), जे त्याकाळी देशाची राजधानी होते. बर्माच्या सैन्याने उद्धवस्त केले होते. त्यानंतर चीनी सैन्य बर्मामध्ये शिरल्यावर त्यांना सियाम सोडावे लागले व येथे एक नवीन राजवंश आणि देशाचा उदय झाला.च्रकी वंशाच्या पहिल्या राजाची उपाधी राम प्रथम अशी होती.
थायलंड प्रमाणेच कंबोडिया मध्ये देखील प्रभू श्रीरामांचे मोठे महत्त्व आहे. तेथे देखील रामकथेचे महत्त्व आहे. थायलंडप्रमाणेच कंबोडियामध्ये रामायणचा स्थानिक संस्करण आहे, ज्याला रिएमकार म्हणतात. येथेही बौद्ध आणि हिंदू धर्माशी मिळते-जुळते अनेक धागेदोरे आढळतात. याशिवाय मलेशिया, लाओस, आणि इंडोनेशिया या देशांमध्ये देखील रामायणाचे वर्णन आढळते.
थायलंड, कंबोडिया, इंडोनेशिय आदी देशांमध्ये जे रामायण आहे, ते अर्थातच बौद्ध धर्मामुळे तेथे गेले.
_____________________________