🟣ही मुंगी चावली तर 15 मिनिटात येतो मृत्यू🟣
http://bit.ly/3tW5Kgj
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
ᘛ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ᘛ
दि. ७ जून २०२१
❢ सगळ्यांनाच कधीनाकधी मुंगी चावली असेलच आणि त्यांनतर होणाऱ्या जळजळीचाही अनुभव असेलच. मात्र जगात त्यापेक्षाही खतरनाक मुंगी आहे जिच्या एका चाव्याने माणसाचा अवघ्या पंधरा मिनीटात मृत्यू होऊ शकतो. विश्वास बसत नाहीय पण हे खरंयं. या मुंगीच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
जगातल्या या खतरनाक मुंगीची बुलडॉग मुंगी अशी ओळख आहे. या मुंगीचे शास्त्रीय नाव मिरमेसिआ पिरीफॉर्मिस असे असून ती ऑस्ट्रेलियन समुद्र किनारपट्टीवर पाहायला मिळते. बुल़डॉग मुंगी चावा घेताना डंख मारते. तो इतका भयंकर वेदनादायी असतो त्याने जीव जाऊ शकतो. 1936 पासून आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या मुंगीच्या चाव्याने 1988 मध्ये शेवटचा मृत्यू एका शेतकऱ्याचा झाला होता. ही मुंगी शिकार करताना अत्यंत आक्रमक आणि चपळाईने शिकार करते. त्यामुळे बुलडॉग मुंगीची सर्वांमध्येच भिती असते.
http://bit.ly/3tW5Kgj
❢ बुलडॉग मुंगीमध्ये डंखात विष असतं. ही मुंगी शिकार करताना लांब आणि अणुकुचीदार दाताने एखाद्याला चावते. त्यावेळी तिचे विष शरीरात जाऊन 15 मिनिटांत माणसावर मृत्यू ओढवू शकतो. मुंगीच्या आकाराबाबत बोलायचे तर तिच्या शरीराची लांबी 20 मिमी तर वजन 0.015 ग्रॅम आहे. या मुंगीला 21 दिवसांचे आयुष्य असते. या धोकादायक मुंग्यांबद्दल 1793 मध्ये शोध लागला.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
ᘛ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ᘛ