काय सांगता! 120 वर्षांपासून सलग पेटतोय बल्ब
http://bit.ly/3tW5Kgj
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*_ᘛ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ᘛ_*
*दि. ७ जून २०२१*
❢ बाजारातून आपण एखादा बल्ब विकत घेतला तर जास्तीत जास्त त्याची वर्षभराची गॅरंटी दिली जाते. परंतु एखादा बल्ब गेल्या 120 वर्षांपासून सलग जळतोय, असं सांगितलं तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. कॅलिफोर्नियामधील लिव्हरमोर शहरातील फायर ब्रिगेड विभागाच्या गॅरेजमधील एका बल्बने गेल्या 120 वर्षांपासून सतत पेटण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
http://bit.ly/3tW5Kgj
❢ या बल्बमुळे या शहराला एक विशेष ओळख मिळाली आहे. इतक्या वर्षांत तो फक्त 2 ते 4 वेळा मानवी चुकांमुळे बंद पडला असेल. इतक्या वर्षांनंतरही त्याचे फिलामेंट आतापर्यंत कसे सुरक्षित आहेत याबद्दल लोकांना कुतूहल वाटते. या बल्बला सेंटेनियल म्हणून ओळखले जाते. हा बल्ब ओहायो इथल्या शेल्बी इलेक्ट्रॉनिक्सने 1890च्या उत्तरार्धात बनवला होता. लिव्हरमोर पॉवर अँड वॉटर कंपनीचे मालक डॅनियल बर्नल यांनी हा बल्ब शहरातील अग्निशमन केंद्राला दान केला. 1901मध्ये हा पहिल्यांदा प्रकाशित झाला होता. त्या वेळी हा बल्ब 60 वॅटचा होता. मग त्याची शक्ती क्षीण झाली. 2021मध्ये या बल्बचा प्रकाश 4 वॅट्स इतकाच राहिला आहे.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*_ᘛ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ᘛ_*