देशाला ‘भारत’ नाव कसं मिळालं ठाऊक आहे? वाचा त्यामागचा पौराणिक इतिहास

🟣देशाला ‘भारत’ नाव कसं मिळालं ठाऊक आहे? वाचा त्यामागचा पौराणिक इतिहास🟣

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍  
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹                         
   
          ❍ दिनांक -  १६ फेब्रुवारी  २०२१
----------------------------------------
आपला देश कोणाला प्रिय नसतो. विविधतेने नटलेल्या आपल्या भारत देशाचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे.
इथल्या भाषा, लोकं, त्यांची पुरातन संस्कृती, भिन्न- भिन्न धर्म आणि चालीरीती असूनसुद्धा आपण सर्व जण भारत या राष्ट्र सूत्रात एकत्र बांधले गेलो आहोत.
भारतात प्रत्येक राज्याची स्वतःची वेगळी खासियत आहे.
आपल्या देशात आढळणारी पुरातन शिल्पे किंवा किल्ले, नालंदा सारखी विद्यापीठे अभ्यासले तर भारताचं नागरी जीवन हे पुष्कळ सुधारलेल आणि समृद्ध असल्याचं दिसून येतं.
देशाच्या बऱ्याच राज्यांना नावं सुद्धा तिथल्या भाषा, संस्कृती नुसार पडली आहेत जसं की तमिळ बोलणाऱ्यांचं तमिळनाडू, कानडी भाषकांचं कर्नाटक तर बंगाली लोकांचा बंगाल!
नावाच्या बाबतीत म्हणायचं तर भारताला ही बरीच नावं होती किंबहुना अजून ही आहेत! इंडिया, हिंदुस्थान ही माहीतीतली नावं. भारत हा संस्कृत शब्द, पण भारत हे नाव कशामुळे पडलं असेल?
आपल्या पैकी बऱ्याच जणांना वाटत असेल की भरताने राज्य केला तो भारत! पण या नावामागे सुद्धा बऱ्याच आख्यायिका भारतीय इतिहासात,वेदात सांगितल्या जातात.
ऋग्वेदातील दशराजन युद्ध!
भारतीय भूखंडाचा इतिहास जर पहिला तर सात प्रमुख नद्या असलेला हा समृद्ध भूभाग. या नद्यांच्या किनाऱ्यावर वेगवेगळ्या समुदाय- जमातीचा विकास झाला.
ऋग्वेदातील १८ व्या सुक्तात एका महाभयंकर जमात युद्धाचा उल्लेख आढळतो. तो म्हणजे दशराजन! म्हणजे दहा पराक्रमी राजांच युद्ध!
भरत जमातीच्या ‘त्रतसु’ वंशाच्या सुदास या पराक्रमी राजाला हरवण्यासाठी बाकी सर्व दहा राजे एकत्र आले होते. हे भयंकर युद्ध आताच्या पंजाब राज्यात असलेल्या रावी नदीकिनारी झालं.
सुदास राजा, त्याची सेना यांनी बाकी दहा राजांसोबत निकराच युद्ध लढलं आणि शेवटी पराक्रम खेचून आणला. सुदास राजाची जगभरात कीर्ती झाली राज्याची वाढ झाली.
या समृद्ध राज्याची जनता नंतर स्वतःला ‘भरत’ समुदायातील म्हणवून घेऊ लागली. पुढे भरतच ‘भरत वर्ष’ म्हणजे भरताची भूमी असं नामकरण झालं आणि पुढे त्याच्याच अपभ्रंश होऊन ‘ भारत’ हे नाव उदयाला आलं!
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/   *❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा ❍*
----------------------------------------
महाभारत आणि भरत चक्रवर्ती
महाभारतानुसार भारताला ‘भरतवर्ष’ नावं सम्राट भरत चक्रवर्ती च्या नावाने कसं पडलं ते सांगणारी कथा आढळते .भरत नामक अत्यंत पराक्रमी राजा होता.
हा भरत समुदायाचा संस्थापक आणि कौरव- पांडवांचा पूर्वज! हस्तिनापूर चा राजा दुष्यंत आणि राणी शकुंतलेचा क्षत्रिय कुलोत्पन्न पुत्र म्हणजे भरत.
जेव्हा भरत हस्तिनापूरच्या गादीवर आला तेव्हा आपल्या पराक्रमाने त्याने ‘अखंड भारत’ आपल्या छत्राखाली आणला.
या मधे सध्याचा भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान चा समावेश होतो. या सर्व राज्यांनाएकत्रित पणे भरताच्या नावावरून ‘भरतवर्ष’ नाव पडलं!
विष्णू पुराणात सुद्धा आहे ‘भरतवर्ष’ चा उल्लेख
उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् ।
वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र संततिः ।।
विष्णू पुराणात असलेल्या या श्लोकाचा अर्थ होतो
‘समुद्राच्या उत्तरेकडे आणि हिमालयाच्या दक्षिणेला
जी भूमी आहे ती म्हणजे भरताच्या वंशजांचा भरतवर्ष’
त्यामुळे भरत हा शब्द पुरणातून आल्याची सुद्धा समजूत आहे. बाकी खंडांपासून वेगळं नाव ठेवण्याकरता त्यांनी भरत भूमीला ‘भरतवर्ष’ संबोधलं.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या देशात सध्याचा भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, अफगाणिस्तान, इराण,तजकीस्थान, उझबेकिस्थान, रशिया, चीन, तुर्कमेनिस्थान आणि तिबेट च्या उत्तर-पश्चिम भागाचा समावेश असल्याचं सांगितलं जातं.
महाभारतात सुद्धा अफगाणिस्थानच्या बाजूच्या राजा ‘गांधार’ चा उल्लेख सापडतो.
संस्कृत भाषेतून उत्पत्ती
भरत शब्द हा मूळचा संस्कृत भाषेतला. याचा शब्दशः अर्थ अग्नी होतो पण याची फोड करून पहिलं तर हे एक विशेषनाम सुद्धा होतं.
भार म्हणजे वाहने किंवा राखून ठेवणे. बऱ्याच संशोधकांच्या मते याचा अर्थ ‘ज्ञानाच्या शोधत असणारा’ असाही होतो.
जैन धर्मातला भारत
पहिल्या जैन तीर्थांकरांच्या जेष्ठ सुपुत्राचं नाव भरत चक्रवर्ती होतं. जैन धर्मानुसार ‘भरत’ हे नाव भरत चक्रवर्ती च्या नावावरून रूढ झालं आणि भारताचं सध्याच नाव ही त्याचीच देण आहे.
केवळ भारतच नाही तर इंडिया आणि हिंदुस्थान शब्दाच्या उत्पत्ती बद्दल सुद्धा इतिहासात काही पुरावे मिळतात.
संशोधकांच्या मते इंडिया हे नाव ‘इंडस’ नावावरून घेण्यात आलं आहे. इंडस चा उगम जुन्या पर्शियन भाषेतल्या हिंदू शब्दावरून झाला.  हिंदू शब्द ‘सिंधू’ नदीच्या किनारी राहणारे ते हिंदू’ या पद्धतीने झाला असावा.
ग्रीक भारताला ‘इंडोई’ म्हणायचे म्हणजेच इंडस- सिंधू नदीकिनारी राहणारे!
भारताला हिंदुस्तान म्हणून पण ओळखलं जातं परंतु हा काही हिंदी शब्द नाही तर तो पर्शियन शब्द आहे. हिंदूंची भूमी असलेला हिंदुस्थान! १९४७ पूर्वी सध्याचा पाकिस्तान आणि उत्तर भारताला ह्याच नावाने ओळखल जायचं.
स्वातंत्र्यांनातर जेव्हा घटनेची निर्मिती झाली तेव्हा त्या वेळेस घटनाकारां समोर देशाच्या नावासाठी बरेच पर्याय होते.  ‘हिंदुस्थान’, ‘हिंद’, ‘भारत’, ‘भरतवर्ष’, ‘भरतभूमी’ इत्यादी. नंतर घटनेने केवळ दोन नावांचा उल्लेख केला.
‘इंडिया म्हणजे भारत हे एक संघराज्य आहे’. अनेक राज्याचं मिळून बनलेला आपला भारत!
राष्ट्रगीत म्हणताना, भारत माता की जय म्हणताना आपलला उर आपसूकच अभिमानाने भरून येतो. आपल्या पूर्वजांच्या कितीतरी पिढ्या इथे राहिल्या,वाढल्या त्यांनी या देशाची संस्कृती टिकवून ठेवली.
इतरवेळी ट्रेन किंवा बस मधल्या सीट साठी एकमेकांशी भांडणारे आपण भारतीय जेव्हा, आपल्या देशावर कुठलंही संकट आलं त्यावेळी मात्र त्याचा एकत्र येऊन यशस्वी मुकाबला सुद्धा केलेला आहे आणि करत आहोत.
शेक्सपिअर म्हणतो की नावात काय? पण आपल्या देशाच्या नावात आपला इतिहास,संस्कृती, अभिमान या बऱ्याच गोष्टी समाविष्ट आहेत आणि त्यांनीच बनला आहे हा ‘अतुल्य’ भारत!
संकलन.इन मराठी टिम
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑  9011714634  𝐕𝐢𝐤𝐢 ✺
                  *_❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
----------------------------------------
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने