एक हजार वर्षापुर्वी कोल्हापूरचं नाव काय होतं

🟣एक हजार वर्षापुर्वी कोल्हापूरचं नाव काय होतं?🟣

||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍   
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||                           
  
           दिनांक -  २७ जानेवारी  २०२१
----------------------------------------
'जगात भारी, आम्ही कोल्हापुरी!' अशी कोल्हापूरची घोषणा जगभर प्रसिद्ध आहे. कोल्हापुरी दिलखुलास माणसं. एकमेकाच्या कामाला पडणारी, भरभरून बोलणारी रांगडी माणसं. तांबड्या मातीला घामानं आंघोळ घालणारी माणसं.

तुमचं कोल्हापूर लै फेमस हाय बरं का! 

हायच की त्यात काय शंका हाय का? 

 कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा, कोल्हापुरी मिसळ, कोल्हापुरी पायतान, कोल्हापूरचा ऊस,  कोल्हापूरचा रंकाळा, कोल्हापूरचा गुळ, एवढंच काय दुनियेत कुठंही 'व्हेज कोल्हापुरी' नावची डिशही मिळते. 

एखादा कोल्हापूरचा गडी पुण्या-मुंबईत काय दिल्लीतबी गेला तरी त्याला आदरानं विचारलं जातं 'पाव्हणं तुम्ही कोल्हापूरचं काय ओ ?' तिथंच आमचा गडी निम्मा खूश होतो.

करवीर नगरीच्या संस्थापिका छत्रपती ताराराणी, लोकराजा राजर्षी शाहूंविषयी माहित नाही असा माणूस नाही. राजर्षी शाहूंची किर्ती, त्यांच्या निर्णयांची दूरदृष्टी आजही दिसून येते. 

हे ऐसपैस माणसांचं कोल्हापूर प्रत्येकाला भूरळ घालतं. जोतिबा, पन्हाळा, न्यु पॅलेस,खिद्रापूर, नृसिंहवाडी, रंकाळा, महालक्ष्मी मंदीर अशी अनेक तीर्थक्षेत्रं आणि पर्यटनस्थळ असल्याने रोज अनेक माणसांची ये-जा असते. महाराष्ट्रचं काय जगभरातून अनेक पर्यटक कोल्हापुरात येत असतात.
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/   *❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा ❍*
----------------------------------------
देशभरात अलिकडे शहरांची नावं बदलायची टूम निघालेली आहे, त्यावरून राजकारणही होत असतं. तो भाग निराळा. 

मग कोल्हापूरचं त्यात काय? कोल्हापूरचं १००० वर्षापूर्वी नाव काय होतं?

१८८६ साली प्रकाशित झालेल्या Gazetteer of the Bombay Presidency -KOLHAPUR DISTRICT, volume XXIV या पुस्तकात यासंबंधीचा उल्लेख आढळतो. 

त्यानुसार कोल्हापूरचं जुनं नाव हे 'पद्मालय' असं होतं. पद्मालय हे नाव कशावरून आलं? 

आज जे महालक्ष्मीचं मंदिर म्हणून ओळखलं जातं. ते मंदिर १०५० सालापर्यंत देवी पद्मावतीचं मंदिर म्हणून ओळखलं जायचं. 

पद्मालय याचा अर्थ असा की, देवी पद्मावतीचं निवासस्थान. सन १०५० नंतर शिलाहारांच्या काळात तिथे देवी महालक्ष्मीची पूजा होऊ लागली. 

आजही या मंदिर परिसरात अनेक मुर्ती दिसून येतात, यापैकी हे काही फोटो.


सदरची माहिती या पुस्तकात उपलब्ध आहे


कोल्हापूरच्या जुन्या नावाविषयीनावाविषयी उल्लेख असलेली हि माहिती
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 9011714634  𝐕𝐢𝐤𝐢 ✺
                  ❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
----------------------------------------
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने