या अजब मंदिरात होतात अशा काही गोष्टी ज्यांची कुणी स्वप्नातही कल्पना केली नसेल!
-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍
❍ दिनांक - ५ नोव्हेंबर २०२०
----------------------------------------
आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. ह्या विविधतेतही एकता आहे, समानता आहे. नाना प्रकारची लोकं येथे राहतात. साहजिकच येथे “व्यक्ती तितक्या प्रकृती” ह्या म्हणीप्रमाणे प्रत्येकाचे आराध्य दैवत वेगवेगळे आहे.
असं म्हटलं जातं की ३३ कोटी देवता आहेत. भारतात आस्तिक आणि श्रद्धाळू लोकांची संख्या खूप मोठी आहे.
काही जणं अध्यात्मात खूप प्रगती केलेले आहेत इथे, काहींना दृष्टांत मिळातो, तर काही राजा-रजवाड्यांनी लोककल्याणसाठी म्हणा, अशा अनेक कारणांनी भारतात असंख्य मंदिरे आहेत.
*कूणच काय, तर भारत हा मंदिरांचा आणि इतर श्रद्धास्थानांचा देखील देश आहे.
आपल्या येथील काही मंदिरे खूप जुन्या काळातील आहेत!
अगदी हजारो वर्षांपूर्वीची आहेत जी तेव्हाच्या भारतीय संस्कृतीची, सभ्यतेची, इतिहासाची आणि संस्कारांची आजही साक्ष देतात आणि भाविक आजही भक्ती भावाने ह्या मंदिरांमध्ये दर्शनाला जातात.
इतकी परकीय आक्रमणे झाली त्यांच्यातल्या जवळ जवळ सगळ्यांनीच ही मंदिरे नष्ट केली, नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण, अजूनही ही देवळे तितक्याच डौलाने, वैभवाने उभी आहेत.
गुजरात मधील सोमनाथ मंदिर गजनीच्या मोहम्मदापासून औरंगजेबापर्यंत १७ वेळा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला पण, तेथील शिवलिंग अभेद्य राहिले आहे!
हीच आपल्याकडील मंदिरे आपली श्रद्धा, संस्कृती, स्थापत्य हे अढळ आहे, अतूट आहे ह्याचीच साक्ष देत आपल्या सर्वांच्या अभिमानाची गोष्ट बनली आहेत.
भारतातील बरीचशी मंदिरे चमत्कारपूर्ण आहेत, काही मंदिरातील मूर्त्या विलक्षण आहेत जसे;
उज्जैनचे भैरवनाथ मंदिर येथील मूर्तीला नैवेद्य म्हणून सोमरस लागतो आणि बऱ्याच जणांनी तर्क-वितर्क काढले की तो सोमरस तळघरात जातो वगैरे पण अद्याप पर्यंत कोणालाच कळलं नाहिये की तो सोमरस कोठे जातो.
काही मंदिरांचे बांधकाम, स्थापत्य वैशिष्ट्यपूर्ण आहे, काही एकाच दगडातून कोरली आहेत तर काहींना आंतरराष्ट्रीय स्थापत्यशास्त्र म्हणून मान्यता मिळाली आहे.
ओरिसाचे कोणार्क मंदिर, त्रिवेंद्रम येथील श्री पद्मनाभ मंदिर, तिरुपती बालाजी मंदिर, शिर्डीचे साईबाबांचे मंदिर इत्यादी अनेक मंदिरे अद्भूत, स्थापत्यशास्त्राची उत्कृष्ट उदाहरणे आहेत.
काही रहस्यपूर्ण मंदिरे आहेत ज्यांची रहस्ये उलगडण्याचे अनेकांनी प्रयत्न केले पण ते प्रयत्न निष्फळ ठरले. जसे, आंध्र प्रदेश मधील विरूपाक्ष मंदिरातील तरंगता खांब!
ह्याचप्रमाणे अशीही अनेक मंदिरे आहेत जी तेथील प्राण्यांमुळे प्रसिद्ध आहेत, जसे राजस्थान मधील करणीमाता मंदिर जेथे उंदरांना अभय आहे आणि हजारो उंदिर येथे फिरत असतात.
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/ ❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा ❍
----------------------------------------
त्यांना कोणीही मारत नाही तेथे. त्यांना नैवेद्य दाखवला जातो, ते पायांवरून गेले तर शुभशकुन मानला जातो.
इतकेच नाही तर उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात नाईचाकूर येथे तर कुत्र्याचे मंदिर आहे.
*आज आपण अशाच एका अनोख्या मंदिराची माहिती घेणार आहोत जेथे एक मगर ह्या मंदिराचे रक्षण करते आणि कधीही अभक्ष भक्षण करत नाही.*
तेथील पूजाऱ्यांच्या हातून नैवेद्य, केवळ सात्त्विक अन्न ग्रहण करते. हे अनंतपूर मंदिर केरळमधील कासरगोड या गावात आहे.
येथील हे एकमेव तलाव असणारे देऊळ आहे जे भगवान विष्णूंचे (भगवान अनंत पद्मनाभ स्वामी यांचे) आहे.
अनंत पद्मनाभ स्वामींचे हे मंदिर २ एकर भागात असून ह्याच्या चारही बाजुला तलाव आहे म्हणजेच हे तलावाच्या मधोमध बांधलेले मंदिर आहे.
ह्या सुंदर मंदिराचे रक्षण एक मगर करते जिला ‘बबिया’ ह्या नावाने ओळखले जाते.
*तिथले स्थानिक आणि पुजारी ह्यांचे असे म्हणणे आहे की एका मगरीचा मृत्यु झाल्यानंतर तिथे आपोआप दुसरी मगर प्रकट होते. आताची मगर येथे जवळ जवळ ६० वर्षांपासून आहे.*
तसेच एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कायम केवळ मांसाहार करणाऱ्या इतर मगरींप्रमाणे ह्या मंदिरातील मगर केवळ नैवेद्य, सात्विक आहार भक्षण करते ते सुद्धा केवळ मंदिराच्या पूजाऱ्याच्या हातून!
इथल्या मूर्तीला दाखविण्यात आलेले नैवेद्याचे पदार्थ नंतर बबियाला दिले जातात तेही तेथील पुजारी तिला भरवतात, अन्य कोणाला ही परवानगी नाही.
त्याचप्रमाणे ही मगर शाकाहारी असल्याने तळ्यातील इतर जीवांना ही नुकसान पोहोचवत नाही.
ह्या तळ्यातील पाण्याची पातळी सारखीच राहते. कितीही मुसळधार पाऊस पडला किंवा खूपच कमी पाऊस झाला तरीही ह्या तळ्यातील पाणी कधीही कमी किंवा जास्त होत नाही म्हणजेच निसर्गात कितीही आणि कोणतेही बदल झाले तरीही ह्या तळ्याच्या पाण्यावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही.
मंदिराचे ट्रस्टी श्री रामचंद्र भट्ट आणि इतर पुजारी वगैरे लोकांचे असे म्हणणे आहे की, ही मगर देवदूत आहे आणि मंदिर तसेच आजुबाजुच्या परिसरात जर काही संकट येणार असेल ही मगर त्याची पूर्वसूचना देते.
बबिया किंवा ह्या तळ्यातील मगरीविषयी अशी वदंता आहे की, इ.स. १९४५ मधे एका इंग्रज अधिकार्याने ह्या मगरीला गोळी मारली होती.
आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, दुसऱ्या दिवशी तीच मगर परत तळ्यात तरंगत होती. पुढे काही दिवसांनी तो इंग्रज अधिकारी साप चावून मृत्युमुखी पडला.
भाविकांचे असे म्हणणे आहे की, सर्पांची देवता अनंत पद्मनाभ हिने त्या इंग्रज अधिकार्याला शिक्षा दिली.
असं म्हंटलं जातं की, ह्या मंदिरातील मूर्ती कोणत्याही धातु पासून किंवा खडका पासून बनवली नाही तर, ७० प्रकारच्या वनौषधी पासून बनवली गेली आहे.
ह्याला ‘कादु शर्करा योग’ असे म्हंटले जाते.
इ.स. १९७२ रोजी ह्या मूर्तीचे पंचधातु मधे रूपांतर करण्यात आले होते पण पुन्हा ‘कादु शर्करा योग’ रूपात त्याचे रूपांतर करण्यात येत आहे.
हे मंदिर तिरुअनंतपुरम येथील श्री अनंत पद्मनाभ स्वामी यांचे मूलस्थान आहे. येथील स्थनिकांचे, भाविकांचे असे विश्वास आहे की, भगवान स्वतः येथे येऊन राहिले होते.
भाविक ह्या मंदिरात दर्शनाला गेले आणि त्यांना ह्या मंदिराच्या तलावात मंदिराचे रक्षण करणाऱ्या बबियाचे दर्शन झाले तर ते खूपच लाभदायक आणि शुभ असते, असे मानले जाते.
तेव्हा आता हे लॉकडाऊन उघडल्यावर, सगळं पूर्ववत आणि सुरळीत झाल्यावर केरळच्या ‘ट्रिप’ चं प्लानिंग केलं तर ह्या मंदिराला अवश्य हेट द्या!
आणि श्री अनंत पद्मनाभ स्वामी (विष्णू) यांचं तर दर्शन घ्याच त्याचबरोबर भाग्यशाली असाल तर तुम्हाला ह्या अनोख्या बबिया चं पण दर्शन होईल.
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 9011714634 𝐕𝐢𝐤𝐢 ✺
❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
----------------------------------------