घर बसल्या खातं उघडा अन् मिळावा 3 सेकंदात 25 लाखांचं कर्ज! या बँकेची धमाकेदार ऑफर
-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍
❍ दिनांक - ५ नोव्हेंबर २०२०
----------------------------------------
आयसीआयसीआय बँकेने ग्राहकांसाठी ‘ICICI बँक माईन’ नावाचा कॉम्प्रेहेन्सिव्ह बॅंकिंग प्रोग्राम सुरू केला आहे. या प्रोग्राममुळे ग्राहक आता थेट घरातून इन्स्टंट सेव्हिंग अकाउंट उघडू शकतात. इतकच नाही तर यामध्ये वैयक्तिक कर्जासह इतर सुविधादेखील ऑनलाइन स्वरुपात मिळणार आहेत.
या सुविधेअंतर्गत ग्राहक iMobile अॅपमध्ये बचत खात्यासोबतच गुंतवणूक सजेशन फीचर्स, डेबिट आणि विशेष क्रेडिट कार्डदेखील मिळवू शकतात.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांची 18 ते 35 अशी वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे.
ICICI बँकेच्या या खास सुविधेचा लाभ घेण्यासाठी iMobile अॅप तुम्ही आयसीआयसीआय बँकेच्या अधिकृत वेबसाइट किंवा गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता.
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/ ❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा ❍
----------------------------------------
या अॅपमध्ये इन्स्टंट सेव्हिंग अकाउंट उघडल्यानं याचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. या अॅपमध्ये फक्त आधार कार्ड आणि पॅनकार्डद्वारे ग्राहक सेव्हिंग अकाउंट उघडू शकतात. यामुळे डिजिटली बचत करणं सोपं जाईल.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रोग्रामअंतर्गत ग्राहकांना लगेच खाते क्रमांक आणि डेबिट कार्ड मिळतं. जे बँकिंग व्यवहार आणि ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी वापरलं जाऊ शकतं.
ग्राहकांना iMobile अॅपद्वारे दोन मोठे फायदे मिळतील. सगळ्यात आधी यामध्ये कस्टमाइज्ड पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट टूल आहे. यामध्ये ग्राहक रिअल टाईम AI बेस्ड अॅनालिटिक्सचा वापर करून स्वतःचं बजेट तयार करू शकतात.
दुसरं वैशिष्ट्य म्हणजं ग्राहकांसाठी बचत सुविधा. यामध्ये ग्राहक त्यांच्या जोखमीवर गुंतवणुकीचा पर्यायसुद्धा निवडू शकतात. यासाठी बँकेनं म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट फिनटेक स्करलशी (Sqrrl) करार केला आहे.
या प्रोग्रामनुसार बँक ग्राहकांना क्रेडिट कार्डही देत आहे. त्यामुळे गरजेनुसार तुम्ही दोन वेगवेगळी क्रेडिट कार्डही घेऊ शकता. सगळ्यात खास म्हणजे अवघ्या तीन सेकंदात 25 लाखांपर्यंत पर्सनल लोन तुम्ही घेऊ शकता.
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 9011714634 𝐕𝐢𝐤𝐢 ✺
*_❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
----------------------------------------