केसांच्या सर्व समस्यांवर “एकच” रामबाण उपाय
केस हे आपल्या आत्मविश्वासाशी जोडलेले असतात, सौंदर्य आकलनाचाही ते एक अविभाज्य भाग आहेत. आजकाल स्त्री असो का पुरुष दोघांचाही दिसण्यावर जास्त अवलंबून असतो व त्यातल्या त्यात शरीरयष्टी व केसांवर जास्त.
केस हे आपल्या आरोग्याविषयी ही बरीच माहिती देऊ शकतात. जसे, पांढरे केस झाले, की शरीरात कॅल्शिअमची उणीव आहे हे समजते, कोंडा जास्त असेल, तर त्यामागे तणाव हेही एक कारण असू शकते हे समजते.
केसांच्या आरोग्यासाठी हवामान, वातावरण सुद्धा तितकेच जबाबदार असते. अती प्रदूषणामुळे, धूळ -माती मुळे केसांच्या अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे सगळेच आपल्या मौल्यवान केसांची निगा रखण्यास्तही अतोनात प्रयत्न करताना दिसतात.
पोटातून औषधे घेणं, चांगला आहार घेणं, वेगवेगळे प्रॉडक्ट्स वापरणं, सॅलोन मध्ये जाऊन महागड्या हेअर ट्रीटमेंट घेणं तर आजकाल फॅड बनत चाललंय.
एक असा उपाय आहे जो आपण कमी पैशांत व कमी वेळेत घरी बसून करू शकतो. तो म्हणजे तेल लावणे. होय, तेल लावणे, किंवा “तेलाची चंपी” ही आपल्या केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे.
आजकाल टीव्हीतल्या हिरोईन सारखे सिल्की, वाऱ्याच्या झुळुकीमुळे उडणारे केस सगळ्यांना हवे असतात, त्यामुळे आपण नियमित तेल लावणे सोडले, पण यामुळे आपण आपल्या केसांची हानी करून घेत आहोत.
त्यासाठीच आज आपण जाणून घेणार आहोत, नियमित तेल लावण्याचे फायदे व तेल कसे लावावे याच्या काही टिप्स.
🟣फायदे
१) कुरळ्या केसांसाठी गुणकारी
केस कुरळे असले, की त्यांना सांभाळणे आणखीनच अवघड होते. हे केस लवकर ड्राय होतात, ज्यामुळे ते भरपूर फुगतात, म्हणजेच फ्रिझी होतात. काहीही केल्या बांधल्या जात नाहीत, गुंता वाढत जातो व भरपूर केस गळू लागतात.
हे सगळे थांबवण्यासाठी अत्यंत गुणकारी उपाय म्हणजे नियमित बदाम, ऑलिव किंवा साध्या खोबऱ्याचे तेल केसांना लावणे. याने केसांना मोईश्चर मिळते व ते फ्रिझी होत नाहीत.
२) हायड्रेशन
तेल लावल्यामुळे केसात एक ओलावा बनून राहतो. बाहेरील वातावरणामुळे डोक्याची त्वचा कोरडी होत नाही. केस हायड्रेटेड राहून केस गळणे कमी होते.
त्यामुळे केसांमध्ये हा ओलावा कायम ठेवण्याकरता आठवड्यातून ३ वेळा रात्री तेल लावून झोपा व अंघोळ केल्यानंतर देखील लगेच तेल लावा.
३) पोषण मिळणे
ज्याप्रकारे आपल्याला शरीराला पोषण लागतं, त्याच प्रमाणे केसांना सुद्धा पोषणाची गरज असते. बदामाच्या तेलात व्हिटॅमिन B, K व E असतात तर ऑलिव्ह ऑईल मध्ये व्हिटॅमिन B6, B3, B12 आढळतात.
त्यामुळे आठवड्यातून किमान दोन- तीन वेळा तेलाने केसांची मालिश करा व त्यांना योग्य पोषण द्या.
४) केसांची जलद वाढ
केसांना तेल लावणे हा उपाय जगभरात केसांची वाढ होण्यासाठी केला जातो. आशिया खंडात खोबरेल तेल, तर युरोप-अमेरिका ब्राझिल मध्ये बदाम तेल केसांची वाढ योग्य प्रकारे व्हावी म्हणून वापरतात.
५) उवांचा त्रास घालवणे
डोक्याची त्वचा कोरडी असली, की डेड स्किनच्या रुपात कोंडा येऊ लागतो व यामुळे निर्माण होणाऱ्या बॅक्टरियामुळे उवां आकर्षित होतात व वाढतात.
त्यामुळे नियमित तेल लाऊन, केस स्वच्छ धुतल्याने हा त्रास पूर्णपणे संपुष्टात आणता येतो.
६) कोंड्यापासून मुक्ती
उवांप्रमाणेच कोंडा सुद्धा रुक्ष व घामटलेल्या त्वचेमुळे व वातावरणाच्या प्रदूषणामुळे वाढतो व केसांना हवे तसे पोषण मिळणे बंद होते.या समस्येवर उपाय म्हणून एरंडेल तेलाने आठवड्यातून ३ रात्री मालिश करा व ते तेल रात्र भर केसांवर राहुद्या. या तेलामुळे डेड स्किनचा त्रास कमी होतो, ज्यामुळे कोंडा जातो व केसांना पोषण मिळण्याचा मार्ग ही मोकळा होतो.
७) मुळांना मजबूत बनवते-केसांना नियमित तेल लावल्यामुळे त्वचेवर साचलेले टॉक्सिन्स, बॅक्टरिया निघून जातात. रक्ताभिसरण चांगले होते व मुळं अजून मजबूत होतात. ज्यामुळे केस गळती कमी होते व केस दाट होतात.
*८) बॅक्टेरियल इन्फेक्शन कधीही होणे नाही –जवळपास सगळ्याच तेलांमध्ये अँटी बॅक्टेरियल व अँटी फंगल गुण असतातच. हे तेल लावल्यामुळे डेड स्किन, बॅक्टेरिया आणि अनावश्यक घटक त्वचेवरून निघून जातात. कुठल्याही प्रकारचे फंगल इन्फेक्शन होत नाही.*
तेल योग्यप्रकारे कसे लावावे याच्या काही टिप्स
१) तेलाचे नीट पोषण मिळण्याकरता स्वच्छ केसांवर तेल लावावे. केस धुवून घ्या व पुन्हा धूळ -माती साचण्याआधी तेल लावा. याने तेलाचे संपूर्ण पोषण केसांना मिळते.
२) कोमट तेल लावल्यास फायदा जास्त होतो व केस अजून मऊ होतात.
३) कोणतेही तेल लावल्यानंतर ३ तासांपर्यंत लाऊन ठेवावे. हलक्या हाताने मालिश करून ३ तासांनी धुवून घ्यावे. हे तेल रात्रभर ठेवले, तर अधिक फायदा होईल.
४) तेलकट केस असतील, तर आठवड्यातून एकदा तेल लावा व कोरडी त्वचा असेल तर दोनदा तेल लावा. रोज थोडे -थोडे तेल लाऊन दर तिसऱ्या दिवशी केस धुतले तरी हरकत नाही.
५) बदाम तेल, मेहंदीच्या पानाचे तेल, एरंडेल तेल, मेथीचे तेल, कडू लिंबाचे तेल, जास्वंदाचे तेल, आवळ्याचे तेल असे विविध प्रकारचे तेल बाजारात उपलब्ध असतात. ते तुम्ही वापरू शकता.
६) शक्यतो पॅरॅबन फ्री शाम्पू, फार सेंट नसलेले शाम्पू वापरा यामुळे लावलेल्या तेलाचा परिणाम जास्त होईल. केसांवर जास्त प्रकारचे केमिकल्स वापरू नका.
*७) कुरळ्या व ड्राय केसांचा नियमित तेल लावण्याची गरज असते व तेलकट केसांना आठवड्यातून २ वेळा तेल लावले तरी चालते. त्यामुळे आपल्या केसांचा टाईप ओळखून त्यानुसार तेल लावा.*
८) तुमचे केस डाय केलेले असतील तर ऑलिव्ह ऑईल तुम्हाला जास्त गुणकारी ठरेल.
*शुद्ध खोबरेल तेल घरी बनवण्याची पद्धत –*
१) फ्रेश नारळ खवून घ्या किंवा काप कापून मिक्सर मधून बारीक फिरवून घ्या व कापडाच्या साहाय्याने घट्ट पिळून त्यातील दूध वेगळे करून घ्या.
२) हे दूध रात्रभर तसेच ठेवा, रात्र भरात तेल खाली साचते व दह्यासारखा पदार्थ वर तरंगतो. सकाळी हे दही व तेल वेगळे करूनघ्या. हे तेल तुम्ही वापरू शकता.
----------------------------------------