मोदी सरकार शेतकर्‍यांना देत आहे शेतीचे सामान आणि अवजारे खरेदीवर 80% ची सबसिडी, असा मिळवा फायदा

🟣मोदी सरकार शेतकर्‍यांना देत आहे शेतीचे सामान आणि अवजारे खरेदीवर 80% ची सबसिडी, असा मिळवा फायदा🟣

-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍     
----------------------------------------                             
          ❍ दिनांक - १७ सप्टेंबर २०२०
----------------------------------------
शेतकर्‍यांच्या समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना आणत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने शेतकर्‍यांसाठी स्माम किसान योजना (SMAM Kisan Yojana) सुरू केली आहे. या योजनेंतर्गत सरकार शेतकर्‍यांना शेतीसाठी अवजारे खरेदी करण्यासाठी आणि उपकरणे खरेदीत मदत करत आहे. सरकार यावर 80 टक्केपर्यंत सबसिडी देत आहे. केंद्राने कृषी क्षेत्रात मशिनिकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांना 553 कोटी रूपये जारी केले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट https://agrimachinery.nic.in वर जाऊन मदत घेऊ शकता.
50 ते 80 टक्के सबसिडीवर मिळतील कृषी उपकरणे
केंद्र सरकार स्माम योजनेंतर्गत कृषी उपकरणांवर 50 ते 80 टक्के सबसिडी प्रदान करत आहे. ही योजना देशातील सर्व राज्यांतील शेतकर्‍यांसाठी उपलब्ध आहे. देशातील कोणताही शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे. या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज सुद्धा भरू शकता.
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/   ❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा ❍
----------------------------------------
या कागदपत्रांची आवश्यकता
1 आधार कार्ड लाभार्थ्याच्या ओळखीसाठी
2 पासपोर्ट साईज फोटो
3 जमीनीची माहिती जोडताना रेकॉर्ड करण्यासाठी भूमीचा अधिकार (आरओआर).
4 बँक पासबुकच्या पहिल्या पाणाची एक कॉपी ज्यामध्ये लाभार्थ्याची माहिती असते.
5 कोणताही एक आयडी प्रूफ (आधार कार्ड / ड्रारूव्हिंग लायसन्स/ वोटरआयडी कार्ड / पॅन कार्ड / पासपोर्ट) ची कॉपी.
6 एससी / एसटी / ओबीसी प्रकरणात जात प्रमाणपत्राची कॉपी.
असे करा अप्लाय
डीबीटी पोर्टलमध्ये नोंदणी करताना शेतकरी ड्रॉप डाऊन यादीत योग्य जिल्हा, उप-जिला, तालुका आणि गाव निवडा. शेतकर्‍याचे नाव आधार कार्डनुसार हेव. श्रेणी (एससी / एसटी / जनरल), शेतकरी प्रकार (लघु / सीमांत / मोठा) आणि लिंग (पुरुष / महिला) योग्य प्रकारे भरा. सबसिडीचा लाभ घेण्यासाठी योग्य माहिती द्यावी.
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑  9011714634  𝐕𝐢𝐤𝐢 ✺
                  ❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
----------------------------------------
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने