मराठ्यांनी एकेकाळी भगवा फडकवलेला हा किल्ला आज पाकिस्तानात आहे..

🟣मराठ्यांनी एकेकाळी भगवा फडकवलेला हा किल्ला आज पाकिस्तानात आहे..🟣

-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍    
----------------------------------------                             
          ❍ दिनांक - २५ ऑगस्ट २०२०
----------------------------------------
 छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची ज्या क्षणाला मुहूर्तमेढ रोवली त्या क्षणापासून जी काही मराठा साम्राज्याने घौडदौड सुरु केली ती कायमच अबाधित राखली आपल्या शूर मराठी वीरांनी.
मध्यंतरीच्या काळात मराठा साम्राज्याने काही वाईट घटना देखील अनुभवल्या. पण पुन्हा नव्या जोमाने उभा राहत त्या शूर वीरांनी मराठा साम्राज्याचा भगवा ध्वज काही खाली येऊ दिला नाही.
पुढे पेशवाईचे युग आले, त्यांनी तर संपूर्ण देशभर मराठा साम्राज्याचा दबदबा निर्माण केला आणि आपल्या परीने होईल तशी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची सेवा केली.
त्याच काळात मराठा इतिहासामध्ये आजवर कधीही न झालेला पराक्रम लिहिला गेला. मराठा सैन्याने हजारो मैल दूर प्रदेशावर निधड्या छातीने आक्रमण केले आणि तेथे आपली पताका रोवली.
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/   *❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा
----------------------------------------
त्याकाळी अब्दाली नामक अफगाण शासक उदयाला आला होता. त्याची नजर भारताकडे वळली होती. भारतावर राज्य करायचे असेल तर मुघल साम्राज्याला दणका देणे भाग आहे हे त्याने ओळखले होते. त्यानंतर त्या दृष्टीने त्याने पाऊलेही उचलली होती.
अब्दालीने मुघलांवर आक्रमण केले.
अश्या आणीबाणीच्या वेळेस मराठ्यांनी मुघलांना साथ देऊन त्यांचे रक्षण करावे असा करार पूर्वीच मराठा आणि मुघल यांच्यामध्ये झाला होता. त्यामुळे मुघलांना सहाय्य करणे मराठ्यांना भाग होते.
ही मोहीम हाती घेतली रघुनाथराव पेशव्यांनी!
याच मोहिमेंतर्गत मराठ्यांनी थेट आजच्या पाकिस्तानपर्यंत बाजी मारली. रघुनाथराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली २८ एप्रिल १७५७ रोजी थोरले तुकोजी होळकर आणि साबाजी शिंदे यांनी अत्‍यंत कठीण परिस्थितीमध्ये तेथील एक महत्त्वपूर्ण किल्ला आपल्या हाती घेतला.
तोच “अटकेचा” किल्ला होय. आता तुमच्या लक्षात आले असेल की, ‘मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले’ ही म्हण कोठून आली…!
हा किल्ला ताब्यात घेणे हा क्षण मराठा इतिहासातीत सुवर्णक्षण होता. कारण केवळ जिद्दीच्या आणि शौर्याच्या आधारे एका अनोळखी प्रदेशात तेथील वातावरणात तग धरून शत्रूला सळो की पळो करून सोडणे हे काही खायचे काम नव्हे.
या किल्‍ल्‍याच्‍या जवळ एक नदी आहे. त्यामुळे ती उतरून किल्ल्यात प्रवेश करणे हे अशक्य कोटीतील काम होते. शिवाय तसे कोणी केले तर तो मनुष्य हमखास किल्ल्यावर तैनात असणाऱ्या सैनिकांना दिसायचा.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठ वडगावची पोस्ट ते सैनिक त्याला तत्काळ अटक करायचे. म्हणूनच या किल्ल्याला आणि प्रदेशाला ‘अटक’ म्हणत असावेत असा एक तर्क इतिहासात पाहायला मिळतो.
*येथे एक तोफखाना पाहायला मिळतो. सिंधू नदीच्या पात्रांत किल्ल्याच्या समोरच कमालिया व जलालिया नावाच्या दोन प्रसिद्ध काळ्या दगडांच्या कड्यांमध्यें भोवरे देखील आहेत. जे येथील एक स्थानिक आकर्षण आहे.
इतिहासातील आणखी एक महत्त्वाची घटना येथे सांगितली जाते ती म्हणजे,
किल्ल्याच्या बाजूला असणाऱ्या नदीच्या वरच्या बाजूस १६ मैलांवर, ओहिंद येथे होड्यांचा पूल करून अलेक्झांडर नदीपार करून आला होता. ही घटना कितपत खरी याबाबत मात्र शंकेस जागा आहे.
अकबराने आपल्या कारकिर्दीमध्ये आपला भाऊ हकीम मिर्झा याच्या सततच्या हल्ल्यांपासून बचाव व्हावा म्हणून हा किल्ला पुन्हा बांधला आणि त्‍याचे अटक-बनारस असे नामकरण केले.
१८१२ साली तरणजितसिंहाने या किल्ल्यावर हल्ला चढवला होता. जेव्हा पहिले शीख युद्ध झाले तेव्हा इंग्रजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता.
परंतु,  दुसर्‍या युद्धांत मात्र त्यांना तो गमवावा लागला. पण युद्ध संपल्यावर इंग्रजांनी कपटाने शीख सैन्याकडून तो किल्ला फिरून आपल्या अधिपत्याखाली आणला.
पुढे इंग्रजांनी १८७३ मध्‍ये सिंधुनदीवर रेल्‍वेपूल व दुसरा एक रस्ता तयार केला.
भारतीय आणि मराठी इतिहासातीत शौर्याचा जिवंत साक्षीदार असलेला हा किल्ला आज पाकिस्तानात आहे.
पण परमुलुखात असला म्हणून काय झाले कधीकाळी त्यावर भगवी पताका फडकली होती हे सत्य कधीच पुसले जाणारे नाही!
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑  9011714634  𝐕𝐢𝐤𝐢 ✺
                  ❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
----------------------------------------
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने