घोरणे उपाय

घोरणे उपाय


फेसबुक लिंक http://bit.ly/3gHxulo
झोपेत घोरण्याची समस्या ही.काही लोकांना झोपेत घोरण्याची सवय असते. ह्या सवयीचा त्यांना स्वतःला काही अपाय होत नसला तरी इतरांची झोप मात्र यामुळे खराब होऊ शकते. मात्र झोपेत घोरणे हि सवय नसून समस्या आहे आणि त्यापासून सुटकारा हि मिळू शकतो.घोरणाऱ्या लोकांना झोपताना घश्यात जळजळ जाणवते. बर्‍याच लोकांना असे वाटते की घोरण्याचा कोणताही इलाज नाही परंतु तो विचार करणे चुकीचे आहे.

घोरणे उपाय,

जेव्हा झोपेच्या वेळी व्यक्ती आपल्या नाक आणि घशातून मुक्तपणे वायु वाहून नेण्यास सक्षम नसते तेव्हा हा आवाज तयार होतो. जेव्हा वायूच्या प्रवाहामुळे घश्याच्या त्वचेमध्ये असलेल्या ऊतींमध्ये कंप आढळतात. जे लोक खूप घोरतात त्यांच्या वारंवार घशात आणि नाकाच्या पेशींमध्ये जास्त कंप असतात. या व्यतिरिक्त, व्यक्तीच्या जीभेची स्थिती देखील श्वास घेण्याच्या मार्गाने येते, ज्यामुळे घोरण्याची समस्या उद्भवते.
त्याकरीता खालील उपाय योजावेत,
१) रात्री झोपताना पाठीखाली उशी घ्यावी, मान खालीटाकावी व दोन्ही नाकपुडीत प्रकृतीप्रमाणे वचादीतेल, शतावरी तेल, ज्येष्ठमध तेल टाकावे.घोरणे कमी होईल.
२) मानेभोवती जास्त चरबी असणार्या व्यक्तींनी वेखंड, हळद व सैंधव मीठ यांचा लेप रात्री झोपण्यापूर्वीमानेभोवती लावल्यास घोरणे कमी होईल.मोठय़ा माणसांनी गळ्याच्या मध्यभागी दिसणार्या काजू सारख्या ग्रंथीवर हळद लावावी .त्यानेही घोरणे कमी होते.
३)एक कप उकळते पाणी घ्या. त्यामध्ये 10 पुदीना पाने घाला आणि थंड होऊ द्या. जेव्हा हे पाणी कोमट होते तेव्हा ते फिल्टर किंवा फिल्टर न करता प्या. यामुले घोरण्याचा त्रास काही दिवसातच बरा होतो.
४) ज्या व्यक्तींना घोरणे तसेच कफाचा त्रास जास्तप्रमाणात आहे त्यांनी जेवणानंतर किंवा रात्री झोपतानाएक चमचा मध, पाव चमचा आल्याचा रस नियमितघ्यावा . फायदा होतो .
५) सकाळी गरम पाण्यात १ २/ चमचा तिळाचे तेल टाकूनपाच मिनिटे गुळण्या कराव्यात.
त्याने घोरणे कमी होते
हे उपाय अवश्य करून पहा

9890875498 

Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने