भयानक प्रयोग

भयानक प्रयोग




असा एक प्रयोग ज्यामध्ये संशोधकाना हे समजुन घ्यायचे होते की, एखादी व्यक्ती जर सलग 30 दिवस झोपलीच नाही तर तीच्या मनावर व शरीरावर काय परिणाम होतो?

भयानक प्रयोग

पण दुर्दैवाने हा प्रयोग जगातील सर्वात भयानक प्रयोग म्हणून प्रसिद्ध झाला.1940 मध्ये सोव्हिएत संघाने शत्रुच्या सैन्यातील 5 जर्मन सैनिकांना या प्रयोगासाठी निवडले. आणी त्यांना 30 दिवसांसाठी एका खोलीत बंद केले.

कोणतीच सोय नाही

या पाचही जर्मन सैनिकांसमोर अशी अट ठेवण्यात आली होती की,जर त्यांनी 30 दिवस न झोपता पुर्ण केले तर त्यांना सुरक्षित पणे सोडण्यात येईल.या सैनिकांसाठी त्या खोलीत जेवण, पिण्याचे पाणी, टाॅयलेट, वाचण्यासाठी पुस्तके अशी सोय करण्यात आली होती. पण त्यांना झोपण्यासाठी किंवा बसण्यासाठी कोणतीच सोय करण्यात आली नव्हती.या सैनिकांवर लक्ष ठेवण्यासाठी 2 वन वे आरसे लावण्यात आले होते.तसेच या सैनिकांना झोप येऊ नये म्हणून त्या खोलीमध्ये थोड्या थोड्या वेळात एक विषारी वायु ऑक्सिजन वायुसोबत सोडण्यात आला. या विषारी वायुमध्ये कोकेन व अपेटामिन यांचे मिश्रण होते.

पहिले चार दिवस व्यवस्थित गेले पण पाचव्या दिवसापासून ते कैदी शत्रु सैनिक बेचैन व्हायला लागले.नवव्या दिवशी त्या पाच कैद्यातील एका कैद्याचे मानसिक संतुलन बिघडले आणी तो तीन तास सतत मोठ्याने ओरडत होता. त्यामुळेच त्याच्या गळ्यातील नसा फाटल्या.सर्वच कैदी विचित्रपणे बडबडत होते आणी हालचाल करत होते.

संशोधन करणारे संशोधक दररोज येऊन निरीक्षण करत होते. दहाव्या दिवशी एका कैद्याने पुस्तकातील पाने फाडून त्या आरशाला चिकटवली, जेणेकरून बाहेरील संशोधकांना आतील दृश्य दिसु नये. काही दिवसांनी संशोधकांना त्या खोलीतुन अजीबात आवाज येत नव्हता. संशोधकांना वाटले की, आतील कैदी मरण तर पावले नाहीत ना?

त्या खोलीतील विषारी वायु बाहेर काढून संशोधकांनी ती खोली उघडण्याची सुचना आतील कैद्यांना दिली, तेव्हा एका कैद्याने ओरडून सांगीतले की,आम्हाला सुटका नकोय तर आम्हाला येथेच रहायचे आहे.

संशोधक आश्चर्यचकित झाले की, कैदी असे का म्हणत आहेत? आतील कैद्याना असेच जागे रहाण्यात मजा येत होती. आणी ते संशोधकांना विनंती करत होते की, आम्हाला असेच राहु द्या.सारे संशोधक विचार करायला लागले की, हे या कैद्यांना झालेय तरी काय?जेव्हा संशोधकांनी ती खोली उघडून आतमध्ये जाऊन आतील दृश्य पाहीले तर,

आतील जेवण तसेच पडले होते. जमीनीवर रक्त पडलेले होते. तसेच एका कैद्याच्या शरीराचे अवयव ठेवले होते. काही कैद्यांनी आपल्या स्वतःच्याच शरीराला ओरबाडून खात होते. एका कैद्याने तर आपल्या पोटातील मांस येवढे खाल्ले होते की, त्याच्या पोटातील हाडे दिसत होती.

संशोधकांनी या कैद्यांना उपचार करण्यासाठी रूग्णालयात दाखल केले. डाॅक्टरांनी या कैद्यांना माॅर्फीनची 8 इंजेक्शन्स देऊन पण ते शुद्धीतच होते. खरेतर माॅर्फीन येवढे जबरदस्त असते की, याच्या एकाच इंजेक्शन मुळे पेशंट बेशुद्ध होतो.ते कैदी डाॅक्टरांना विनंती करत होते की, आमचे ऑपरेशन शुद्धीत असतानाच करावे. कारण आम्हाला वेदनांमध्ये खुप आनंद येतो.

डॉक्टर ऑपरेशन करत असताना ते कैदी हसत होते. ऑपरेशन करत असतानाच पाच मधील तीन कैद्यांचा मृत्यु झाला.रशियन कमांडर ऑफीसर ने ऑपरेशन झाल्यानंतर परत संशोधन सुरू करण्याची ऑर्डर दिली.हे संशोधन अमावतेच्या पुढे गेल्याने सर्वच संशोधकांनी हे संशोधन इथेच थांबवावे असे सांगीतले, पण रशियन कमांडरने संशोधकांचे न ऐकता हे संशोधन पुढे चालु ठेवण्याचा आदेश दिला.

या दोन कैद्यांबरोबर तीन संशोधकांना सुद्धा त्या खोलीत ठेवण्याचा आदेश पण दिला, तेव्हा तीन संशोधकांपैकी एकाने घाबरून त्या कमांडिंग ऑफीसरलाच गोळी घालून मारले. येवढेच नव्हे तर त्या दोन कैदी व दोन संशोधक यांना पण गोळी घालून मारले. नंतर स्वतःला पण गोळी झाडून आत्महत्या केली.

2009 मध्ये Creepypasta wiki च्या वेबसाईटने एका गुप्त अकाऊंट च्या माध्यमातून हे भयंकर संशोधन जगासमोर आणले. त्या अकाऊंट वरून असा दावा करण्यात आला होता की, हे एक असे रहस्य आहे की जे जाणूनबुजून जगापासून लपवुन ठेवले गेले होते.

मात्र या दाव्याला आणी या संशोधनाला रशियन सरकारने मान्य केलेच नाही. रशियन सरकारने सांगीतले की, असा प्रयोग कधीच झाला नाही. ही एक काल्पनिक कहानी आहे.

संदर्भ- vintagesWeslley Snaydeer

फुटनोट- http://विज्ञान का सबसे अमानवीय प्रयोग | Russian Sleep Experiment  

Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने