पिरॅमिड आयताकृती दगडांपासून बनवलं गेलं आहे. या दगडांचं साधारणतः वजन २ हजार किलो ते ७० हजार किलो इतकं सांगितलं गेलंय.आजच्या काळात आधुनिक तंत्रज्ञान आणि मशिनरीज द्वारे जास्तीत जास्त २० हजार किलो वजन एका वेळी उचलता येतं. ज्या मोठमोठ्या इमारती आपण बघतो त्यांच्या बांधकामात. मग प्रश्न हा आहे की चार हजार वर्षांपूर्वी त्या कामगारांनी हे ७० हजार किलोचे ब्लॉक्स ( दगड ) इतक्या वर पर्यंत कसे नेले होते? तेही कुठल्याही तांत्रिक मदतीशिवाय. कारण माणसांना इतकं जास्त वजन उचलणे म्हणजे केवळ अशक्य गोष्ट आहे. त्यात ते जमिनीपासून ४८० फूट उंची पर्यंत नेणे कसे शक्य झाले असावेत?
अवकाशात एक तारकासमूह आहे ज्यात तीन तारे मुख्यतः दिसतात. या तारकासमूहाचं नाव " ओरायन बेल्ट - Orion Belt " असं आहे. यातल्या ताऱ्यांची नावे अनुक्रमे Alnitak , Alnilam आणि Mintaka अशी आहेत. गंमत अशी आहे की हे तीन तारे आणि तिन्ही पिरॅमिड अगदी एकाच पद्धतीने वसलेले आहेत. म्हणजे आकाशात जसा हा समूह दिसतो त्याच प्रकारे अवकाशीय दृश्यात बघता पिरॅमिड दिसतात. हा निव्वळ योगायोग आहे की आणखी काही ?याविषयी जास्त स्पष्टीकरण सध्या तरी उपलब्ध नाहीत. पण शास्त्रज्ञ या गोष्टीवर पूर्ण लक्ष ठेऊन आहेत. त्याकाळी लोकांची मान्यता होती की मृत राजाला ममी बनवून पिरॅमिड मधील चेंबर्स मध्ये ठेवल्यास त्यांची आत्मा याच तीन ताऱ्यांकडे जाते. अशी फक्त एक मान्यता होती.
राजा किंवा राणी मरण पावल्यानंतर त्यांच्या मृत शरीराला विविध औषधी मसाल्यांचं लेपण करून त्यावर कापड गुंडाळून त्यांना पेटीत ठेवून समाधीत ठेवतात आणि ही समाधी पिरॅमिड मध्ये असते असं सगळ्या जगाला माहिती आहे. पण जगभर प्रसिध्द असणाऱ्या या तीन पिरॅमिड मध्ये आजवर एकही ममी किंवा त्यांची समाधी सापडलेली नाहीये.
हे एक आश्चर्य आहे पण खरं आहे. इतर भागांतल्या पिरॅमिड मध्ये आशा प्रकारच्या ममीज सापडल्या आहेत. पण या तिन्ही पिरॅमिड मध्ये आजवर झालेल्या शोधात कुठल्याच चेंबर मध्ये ममी किंवा शवपेटी मिळालेली नाही. ज्यावेळी या गोष्टी समोर आल्या तेव्हा शास्त्रज्ञांना सुद्धा धक्का बसला होता. पण त्यानंतर अभ्यासकांनी असा दावा केला की हे पिरॅमिड या कामासाठी बनवले गेलेच नव्हते. त्यांच्या उभारणी मागे काहीतरी वेगळाच हेतू होता. नक्की काय होतं हे अजून कळलेलं नाहीये. जर पिरॅमिड मध्ये कुठल्याही ममी ठेवल्या गेल्या नव्हत्या तर मग कुठल्या हेतूने पिरॅमिड बनवले गेले असावेत हा प्रश्न आहे. पिरॅमिड बांधणे किती अवघड काम होतं हे ज्यावेळी लक्षात येतं तेव्हाच ही गोष्ट स्पष्ट होते की एवढा मोठा लवाजामा काही उगाच म्हणून केलेला नसणार. कारण सलग वीस वर्षे हे काम चाललं होतं. दहा लाखांपेक्षा अधिक कामगार या कामात जुंपले होते. काहींच्या दोन - तीन पिढ्या या कामात लागलेल्या होत्या. चुनखडीचे मोठाले दगड २५० किमी अंतरावरून वाहून आणणे अजिबातच सोपे नव्हते. त्यांना वर पर्यंत नेणे सुद्धा सोपे नव्हते. मग इतक्या सगळ्या मेहनती मागे काहीतरी मोठा हेतू नक्कीच असायला हवा.
अभ्यासक मानतात की पिरॅमिड हे मानवाला देव बनवण्यासाठी बांधले गेले होते. त्याकाळी ही मान्यता होती की राजा किंवा राणी मरण पावल्यानंतर ते पिरॅमिड मध्ये जातील आणि त्यांच्या आत्म्याला देवत्व प्राप्त होईल. यासाठी जी सिद्धी करावी लागते त्यासाठी आवश्यक सगळ्या गोष्टी त्या समाधीत ठेवल्या जात असत. जिथे या समाधी होत्या त्या चेंबर मध्ये भोवतालच्या भिंतींवर वेगवेगळ्या आकृत्या रेखाटलेल्या होत्या. हायरोग्लिफ लिपीत वेगवेगळे शब्द वगेरे लिहिलेले होते. जेणेकरून राजा देव होईल आणि आकाशात एक तारा म्हणून त्याला जागा मिळेल. जगाचा नकाशा घेतला आणि त्यात बघितलं तर संपुर्ण पृथ्वीचा एकदम मध्याचा भाग कोणता असेल ? पिरॅमिड हे पृथ्वीच्या अगदी केंद्रस्थानी वसलेले आहेत. आश्चर्याची बाब आहे. कदाचित हा योगायोग देखील असू शकतो. पण हे खरं आहे. ज्याकाळी हे पिरॅमिड बांधले गेले होते तेव्हा मानवाला नकाशा माहिती नव्हता. पृथ्वी पूर्ण नेमकी कशी आहे हेदेखील माहिती नव्हतं. शिवाय त्याकाळी पृथ्वी आणि सूर्यमाला यांच्या संबंधीत मान्यता सुद्धा अनेकांच्या अनेक होत्या. मग हा फक्त योगायोग आहे की आणखी काही ?
अजून एक गोष्ट म्हणजे दरवर्षी २१ जून हा सर्वात मोठा दिवस म्हणून गणला जातो. या दिवसाची रात्र छोटी असते. या दिवशी पिरॅमिडचं दृश्य बघण्यासारखं असतं. सूर्य हा स्फिंक्सच्या मूर्तीच्या अगदी मागे दिसतो. हे इतकं तंतोतंत कसकाय असू शकतं ? आणि हे सगळं असण्यामागे फक्त योगायोगच आहेत की खरंच एखाद्या वेगळ्या हेतूने हे बांधकाम केलं गेलं आहे ?
शोधकार्य
शोधकार्यासाठी बनवला गेलेला तो रोबोटिक कॅमेरा आत सोडला जाणार होता. आत काय रहस्य दडलं आहे याचा शोध घेण्यासाठी. पण त्यानंतर अभ्यासकांना जे दिसलं , त्याचा उलगडा अजूनही झालेला नाही.विशेष प्रकारचा रोबोटिक कॅमेरा बनवला गेला. जो आत जाऊन बघू शकेल की तिथे नेमकं आहे काय. त्या भागात एक छोटी पोकळी होती जिच्यामध्ये हा कॅमेरा सोडला जाणार होता.