बाबो! चक्क भूतासोबत लग्न, महिलेचा अजब दावा; ‘असा’ करायचा संपर्क, ऐकून सगळेच हैराण

बाबो! चक्क भूतासोबत लग्न, महिलेचा अजब दावा; ‘असा’ करायचा संपर्क, ऐकून सगळेच हैराण



भूतप्रेताच्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. भूताचं नाव घेतलं तरी काही जणांचा थरकाप उडतो. मग समजा, कुणी म्हटलं मी भूताची लग्न करणार आहे तर? ऐकूनच तुम्ही हैराण झाला असाल. परंतु इंग्लंडमध्ये एका महिलेने चक्क भूताची लग्न करणार असल्याचा अनोखा दावा केला आहे. लवकरच ती भूताची लग्न करणार असल्याचं महिला सांगते. हा अजब दावा करणारी महिला इंग्लंडच्या ऑक्सफोर्डशायर इथं राहते.

ब्रोकार्डे नावाच्या ३८ वर्षीय महिलेने केलेल्या दाव्यामुळे सगळेच हैराण झाले आहेत. ही महिला सांगते की, एडवर्डो नावाच्या भूतासोबत ती लग्न करणार आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, महिला ज्या भूताशी लग्न करण्याचा दावा करतेय तो विक्टोरियन काळातील सैनिक आहे. ब्रोकार्डे स्वत: गायिका आहे. ती एडवर्डो भूतावर खूप प्रेम करते. एडवर्डोही तिच्यावर प्रेम करत असल्याचे सांगते. एडवर्डोचा स्वभाव चिडचिडा आहे. दोघांनी लग्न करण्याचं निश्चित केले आहे. परंतु अद्याप लग्नाची तारीख फिक्स केली नाही.

महिलेने सांगितले की, ते उन्हाळ्याच्या दिवसांत लग्न करु इच्छितात. तर तिचा प्रियकर एडवर्डोला हिवाळी ऋतु आवडतो. एडवर्डोला गरमीच्या काळात चीड येते. एडवर्डोसोबत अजब प्रकारे बोलते. एडवर्डो क्रिप्टिक मेसेजच्या माध्यमातून महिलेला संदेश पाठवतो. आंघोळीवेळी गरम पाण्याच्या वाफेवर लिहून तो बोलतो. किंवा घरातील कुठलीही तरी वस्तू खाली पाडून त्याच्या आवाजाने तो माझ्याशी बोलत असल्याचं तिने म्हटलं.

अनोख्या पद्धतीनं भूताने केले प्रपोज

या महिलेने दावा केला आहे की, एडवर्डोने मागील वर्षी एक अंगठी उशीच्या बाजूला ठेवून त्याने प्रपोज केले होते. त्यानंतर वाफेच्या सहाय्याने प्रश्नचिन्ह बनवून माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील का? असं विचारलं. सध्या या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. लग्नामध्ये दिवंगत अभिनेत्री मर्लिन मुनरो हिच्या भूतालाही ती आमंत्रित करु इच्छिते. त्याशिवाय जगातील प्रसिद्ध नाटककार विलियम शेक्सपिअर यांच्या भूतालाही लग्नासाठी बोलवायचं आहे असं महिलेने सांगितले. मात्र महिलेच्या दाव्यामुळे सध्या ती चर्चेचा विषय बनली आहे.
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने