WhatsApp स्टेटससाठी २६ वर्षीय तरुणीला सुनावली मृत्यूदंडाची शिक्षा; जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण

WhatsApp स्टेटससाठी २६ वर्षीय तरुणीला सुनावली मृत्यूदंडाची शिक्षा; जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण


पाकिस्तानमधील एका महिलेला ईश्वरनिंदेच्या गुन्ह्यासाठी म्हणजेच इस्लामचा अपमान केल्याप्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलीय. आरोपी महिलेचे नाव अनिका अतीक असं आहे. अनिकाविरोधात २०२० साली ईश्वरनिंदा प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पाकिस्तानमधील रावळपिंडी न्यायालयाने तक्रारदार फारुक हसनातच्या तक्रारीनंतर बुधवारी या प्रकरणामध्ये निकाल दिला. अनिका अतीकवर तीन आरोप सिद्ध झाले आहेत. २६ वर्षीय अनिकाविरोधात निश्चित झालेल्या आरोपांमध्ये पहिला गुन्हा मोहम्मद साहब (ईश्वराचा) अपमान करणे, दुसरा गुन्हा इस्लामचा अपमान करणे आणि तिसरा गुन्हा सायबर कायद्याअंर्गत येतो. ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार अनिका आणि फारुक हे जवळचे मित्र होते. मात्र त्यांच्यामध्ये काही कारणाने वाद झाला. त्यावेळी रागात अनिकाने फारुकला व्हॉट्असवर मोहम्मद सहा आणि इस्लामचा अपमान करणारा मेसेज पाठवला.
फारुकने पहिल्यांदा अनिकाला स्वत:ची चूक मान्य करुन माफी मागण्यास सांगितलं. तसे त्याने तिला तो मेसेज डिलीट करण्यास सांगितलं होतं. मात्र याला अनिकाने नकार देत हा संदेश व्हॉट्अपला स्टेटस म्हणून ठेवला. त्यानंतर फारुकने अनिकाविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणामध्ये चौकशी करण्यात आल्यानंतर फारुकने केलेली तक्रार आणि अनिकावर लावण्यात आलेले आरोप बरोबर असल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर शिक्षेच्या सुनावण्यासाठी हे प्रकरण न्यायलयामध्ये गेलं. या न्यायनिवाड्यामध्ये अनिकाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलीय.
पाकिस्तानमधील ईश्वरनिंदेचा कायदा हा फार कठोर आहे. लष्करी हुकुमशाह जनरल जिया-उल-हकने १९८० च्या दशकामध्ये हा कायदा देशात लागू केला होता. पाकिस्तानमध्ये ईश्वरनिंदेच्या शंकेवरुन अनेकदा लोकांची हत्या झाल्याची प्रकरण समोर येत असतात. मागील वर्षी एका श्रीलंकन व्यक्तीवरही असेच आरोप ठेवत केवळ शंकेवरुन त्याला जमावाने मारहाण करुन मारुन टाकलं होतं. या प्रकरणात मरण पावलेली श्रीलंकन व्यक्ती सियालकोटमध्ये काम करत होती.
मागील डिसेंबरमध्ये पाकिस्तानच्या चारसद्दा जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या बशीर मस्तान नावाच्या व्यक्तीला ईश्वरनिंदेच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवण्यात आलेलं. खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या न्यायालयाने इंटरनेटवर व्हिडीओ अपलोड करुन ईश्वरनिंदा केल्याच्या या प्रकरणामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलीय. तसेच या व्यक्तीला एक लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला.
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने