प्रेयसीला भेटण्यासाठी विवाहित प्रियकर करायचा संपूर्ण गावाचा वीजपुरवठा बंद, अखेर गावकऱ्यांनी पकडले आणि मुंडण करून लग्न लावले

💝प्रेयसीला भेटण्यासाठी विवाहित प्रियकर करायचा संपूर्ण गावाचा वीजपुरवठा बंद, अखेर गावकऱ्यांनी पकडले आणि मुंडण करून लग्न लावले💝
=========================


- बिहारमधील पुर्णिया जिल्ह्यामधून एका अजब प्रेमकहाणीची घटना समोर आली आहे. येथील एक विवाहित प्रियकर रात्रीच्या वेळी त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी सुमारे तीन तास गावातील वीजपुरवठा खंडित करायचा. प्रियकराचा हा प्रताप अखेर एके दिवशी गावकऱ्यांनी रंगेहात पकडला. त्यानंतर त्याला शिक्षा करण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांनी त्याला पकडून आधी त्याचे अर्धे मुंडण केले. त्यानंतर त्याच्या गळ्यात चपलांचा हार घातला. अखेरीच त्याचे त्याच्या प्रेयसीसोबत लग्न लावून दिले.
मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार कृत्यानंदनगर ठाण्याच्या परिसरातील गणेशपूर पंचायत येथे घडला. येथील वायरमन सुरेंद्र राय त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी दररोज तीन तास गावातील वीजपुरवठा खंडित करायचा. एकेदिवशी सुरेंद्रला ग्रामस्थांनी त्याच्या प्रेयसीसह मौजमजा करत असताना रंगेहात पकडले. त्यानंतर लोकांनी या दोघांनाही चपलांचे हार घातले. तसेच दोघांचेही मुंडण करून त्यांना गावभर फिरवले. तसेच अखेरीस त्यांचे लग्न लावून दिले. आता ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
परोरा गावातील वायरमन सुरेंद्र राय आणि डहेरिया आदिवासी टोला येथील एक आदिवासी तरुणी यांच्यात गेल्या पाच वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. तो या प्रेयसीला जेव्हा जेव्हा भेटायला जायचा तेव्हा डहेरिया गावातील वीजपुरवठा तीन तासांसाठी खंडित करायचा.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रुप भादोलेची पोस्ट त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त होते. अखेरीस वायरमनचा कारनामा सर्वांसमोर आला आणि ग्रामस्थांनी त्याला रंगेहात पकडण्याची योजना आखली. एके दिवशी वीजपुरठा खंडित झाल्याबरोबर ग्रामस्थांनी दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. ग्रामस्थांनी त्यांना आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. आधी त्यांना मारहाण केली. त्यानंतर चपलांच्या माळा घालून नंतर त्यांचे लग्नही लावून दिले. यातील प्रियकर हा विवाहित होता. तसेच नेहमी मद्यधुंद अवस्थेत प्रेयसीकडे जायचा. दोघांमध्ये बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध होते.
@@@@@@@@@@@@@@
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने