जेवणाचं बिल 14 हजारांचे अन् टीप दिली 7 लाखांची

जेवणाचं बिल 14 हजारांचे अन् टीप दिली 7 लाखांची



गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचा फटका जगभरातील सर्वच उद्योगधंद्यांना बसला आहे. निर्बंध शिथिल होताच हॉटेल आणि रेस्टॉरंट पुन्हा एकदा सुरू झाली असून ती ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच एक अजब बातमी समोर आली आहे. रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी आलेल्या एका ग्राहकाने वेटर्सना चक्क सात लाख रुपयांची टीप दिली आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीच्या जेवणाचे बिल फक्त 14 हजार रुपये एवढेच झाले होते. ग्राहकाच्या या दिलदारपणामुळे रेस्टॉरंटमधील स्टाफदेखील भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
अमेरिकेतील फ्लोरिडा येथील ही घटना आहे. मंगळवारी ही व्यक्ती वाहो सीफूड ग्रील रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी आली होती. जेवण करून झाल्यानंतर त्याने बिल मागितले. त्याचे बिल साधारण 14 हजार रुपयांचे झाले होते. त्यानंतर त्याने संपूर्ण स्टाफला डायनिंग एरियामध्ये बोलावले अन् तब्बल 7 लाख 13 हजार रुपयांची टीप दिली. एवढय़ावरच न थांबता या पैशांचे सर्वांमध्ये कशा पद्धतीने वाटप करायचे हेदेखील त्याने सांगितले. त्यानुसार प्रत्येक स्टाफला आता 75 हजार रुपये मिळाले आहेत. रेस्टॉरंटच्या मालकाने हा संपूर्ण अनुभव इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. कोरोनामुळे हे संपूर्ण वर्ष हॉटेल इंडस्ट्रीसाठी आर्थिकदृष्टय़ा चांगले गेले नाही, पण या घटनेनंतर माणुसकीवरील विश्वास वाढल्याचे रेस्टॉरंटच्या मालकाने पोस्टमध्ये म्हटले आहे.
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने