झारखंड येथील श्री छिन्नमस्तिकादेवी मंदिर
💥 मस्तक नसलेली एकमेव मुर्ती
_________________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
_________________________________
झारखंडची राजधानी रांची शहरापासून ८५ किलोमीटर अंतरावर श्री छिन्नमस्तिका देवीचे मंदिर आहे.. हे मंदिर वास्तुकलेनुसार बांधले गेले आहे . त्याच्या गोलाकार घुमटपणाची कला आसाममधील 'कामाख्या मंदिर'च्या हस्तकलाशी मिळतीजुळती आहे. मंदिराला एकच प्रवेशद्वार आहे. भैरवी-भेडा आणि दामोदर या नद्यांच्या संगमावर वसलेले हे मंदिर विश्वातील दुसरे सर्वांत मोठे शक्तिपीठ आहे.या मंदिरात मस्तक नसलेल्या देवीची पूजा केली जाते.या मंदिराची स्थापना ६ सहस्र वर्षांपूर्वी झाली. मंदिराच्या उत्तरेला एका भिंतीलगत असलेल्या विशाल शिलाखंडावर श्री छिन्नमस्तिकादेवीचे दिव्य रूप विराजमान आहे. श्री छिन्नमस्तिका मंदिराच्या आतमध्ये असलेल्या शिलाखंडामध्ये देवीचे ३ नेत्र आहेत. डावा पाय समोर केलेली देवी कमळाच्या पुष्पावर उभी आहे. तिच्या पायाखाली कामदेव आणि रति रतिमुद्रेत आहेत. श्री छिन्नमस्तिकादेवीचा गळा सर्पमाळा आणि मुंडमाळा यांनी सुशोभित आहे. पसरलेला केशसांभार, बाहेर असलेली जिव्हा आणि अलंकार यांनी नटलेली देवी दिव्य रूपात आहे. उजव्या हातामध्ये तलवार आणि डाव्या हातामध्ये स्वत:चे कापलेले मस्तक आहे.
देवीच्या आजूबाजूला डाकिनी आणि शाकिनी उभ्या आहेत. देवीच्या गळ्यातून रक्ताच्या ३ धारा वहात असून देवी डाकिनी आणि शाकिनी यांना रक्तपान करत आहे. एक रक्ताची धार देवीचे मस्तक स्वत: ग्रहण करत आहे. या ३ रक्तधारा हे इडा, पिंगळा आणि सुषुम्ना या तीन नाड्यांचे संतुलन करून योगमार्गामध्ये सिद्धी मिळाल्याचे दर्शक आहे.दक्षिणेकडे तोंड असलेल्या माता चिन्नमस्तिकाचे दैवी रूप मंदिराच्या उत्तरेकडील भिंतीच्या बाजूने एका दगडाच्या ठोक्यावर कोरलेले आहे. आईचे हे दिव्य रूप भाविकांना उत्साहात भरते. चिन्नमस्तिका मंदिराव्यतिरिक्त येथे इतरही मंदिरे आहेत. ही महाकाली मंदिर, सूर्य मंदिर, दस महाविद्या मंदिर, बाबाधाम मंदिर, बजरंगबली मंदिर, शंकर मंदिर आणि विराट रूप मंदिर आहेत. हे मंदिरातील भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.भारतात मोगल राज्य करत असतांना अनेक वेळा त्यांनी हे मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना त्यात यश आले नाही.मात्र अकबर बादशहा या मंदिरात येऊन दर्शन घेऊन गेल्याची नोंद आहे.भारतातील इंग्रजांच्या वास्तव्याच्या वेळी इंग्रज देवीच्या दर्शनासाठी येतअसत.मंदिरासमोर बळी देण्याचे स्थान आहे. येथे देवीला प्रतिदिन बकर्यांचा बळी दिला जातो. बळी देण्याचे स्थान असूनही त्या ठिकाणी एकही माशी येत नाही, हे एक आश्चर्य आहे.मंदिरासमोर पापनाशिनी कुंड आहे. रोगग्रस्त व्यक्तींनी या कुंडात स्नान केल्यास ते रोगमुक्त होतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे.पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना मंदिर मध्यरात्रीपर्यंत उघडे असते.आसाममधील कामाख्या देवी आणि बंगालमधील तारा देवी यांच्यानंतर झारखंडमधील छिन्नमस्तिका देवीचे मंदिर हे तांत्रिक स्वरूपाची साधना करणार्यांचे मुख्य स्थान आहे.