स्मार्टफोन हरवल्यास पेमेंट अ‍ॅप्स कसं कराल सुरक्षित....!

  स्मार्टफोन हरवल्यास  पेमेंट अ‍ॅप्स कसं कराल सुरक्षित....!

============================================

फोन हरवल्यास सेव्ह असलेल्या बँक अकाउंट्स, पेमेंट अ‍ॅप्सचा चुकीचा वापर होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे फोन हरवल्यानंतर लगेचच हे पेमेंट अ‍ॅप्स ब्लॉक करणं सर्वात सुरक्षित पर्याय ठरतो.

  पेटीएम अकाउंट कसे ब्लॉक कराल? 

● पेटीएम पेमेंट बँकेच्या हेल्पलाईन नंबर 01204456456 वर कॉल करा.

Lost Phone हा पर्याय निवडा.

● दुसरा नवा नंबर लिहिण्याच्या पर्यायात जा आणि तुमचा हरवलेला फोन नंबर लिहा.

● सर्व डिव्हाईसमधून Logout करण्याचा पर्याय निवडा.

त्यानंतर पेटीएम वेबसाईटवर जा आणि 24*7 हेल्पची निवड करण्यासाठी खाली स्क्रॉल करा.

● रिपोर्ट फ्रॉड पर्यायात जा आणि कोणत्याही कॅटेगरीवर क्लिक करा.

● त्यानंतर कोणत्याही इश्यूवर क्लिक करा आणि सर्वात खाली असलेल्या Message Us बटणावर क्लिक करा.

● तुम्हीच या अकाउंटचे खरे युजर आहात हे सांगण्यासाठी एक सर्टिफिकेट जमा करावं लागेल. जे डेबिट-क्रेडिट कार्ड डिटेल्स असू शकतात. ज्यात पेटीएम खात्यातील व्यवहार, व्यवहारासाठी एक कन्फर्मेशन ईमेल किंवा SMS, हरवलेल्या किंवा चोरी झालेल्या फोनची पोलीस स्टेशनमधील FIR अशा कोणत्याही गोष्टी सर्टिफिकेट म्हणून असू शकतात. 

✅ या प्रोसेसनंतर पेटीएम तुमचं खातं ब्लॉक करेल आणि त्यानंतर कन्फर्मेशन मेसेज येईल. 



--------------------------------------------

Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने