कोल्लम येथील शकुनीमामा मंदिर

कोल्लम येथील शकुनीमामा मंदिर 
_________________________
माहिती सेवा ग्रूप 
_________________________

फेसबुक लिंक https://bit.ly/3mUoD0L
महाभारतातील व्हिलन अशी ओळख असलेला शकुनी मामा कितीही दुष्ट व वाईट असला तरी केरळ मधील कोल्लम येथे एका समुदायासाठी तो पूजनीय आहे.

कोल्लम येथील शकुनीमामा मंदिर
कोल्लम येथे शकुनीमामाचे मंदिर असून त्याचे नांव मायकट्टू मलंचा रूवुमलनाड असे आहे. परंपरेनुसार या मंदिरात शकुनीमामाला नारळ, रेशमी वस्त्र व ताडी अर्पण केली जाते. इतकेच नव्हे तर येथे मलक्कुडा महोलसवम या नावाने त्याचा वार्षिक उत्सवही साजरा केला जातो. सध्या या स्थानाला पवित्रेश्वरम असे म्हटले जाते.♍असे सांगतात की शकुनी कितीही दुष्ट असला तरी महाभारताच्या युद्धानंतर तो सात्विक बनला होता.  पापांतून मुक्ती मिळविण्यासाठी व मोक्ष मिळविण्यासाठी त्याने शिवतपस्या केली होती. ज्या जागेवर त्याने ही तपस्या केली ती जागा म्हणजेच सध्याची मंदिराची जागा. येथे एक शिळा आहे. या शिळेचा उपयोगच शकुनीने तपस्येसाठी केला होता अशी श्रद्धा आहे. या शिळेची विधीवत पूजा केली जाते. या मंदिरात देवी भुवनेश्वरी, किरातमूर्ती, नागराज यांच्याही पूजा केल्या जातात. महाभारतातील युद्धाला शकुनी सर्वतोपरी जबाबदार नसला तरी त्याने कौरवांना युद्धाला भरीस घातले होते. शकुनी नसता तर कदाचित हे युद्ध झालेच नसते व भारताचा इतिहास कांही वेगळाच लिहिला गेला असता अशी येथील लोकांची भावना आहे.

माहिती सेवा गृप 

Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने