या गावात आल्यावर गरिबी दुर होते
श्रींमत बनवणारे गाव
फेसबुक लिंक http://bit.ly/2L6YcGT
उत्तराखंडच्या बद्रीनाथपासून 4 किलोमीटर दूर भारताचे शेवटचे गाव 'माणा' आहे. या गावात अशी मान्यता आहे की, या गावात आल्यावर गरिबी दुर होते. असे म्हणले जाते की या गावावर भगवान शंकराचा आशीर्वाद मिळाला आहे. चीनच्या सीमेला लागलेले उत्तराखंडचे हे शेवटचे गाव आहे. तसे पाहिले तर या गावाचा ईतिहास महाभारत काळापासुन आहे. असे सांगितले जाते की, या गावातुनच पांडव स्वर्गात गेले होते. जाणून घ्या या ऐतिहासीक गावाबद्दल...गावाचे पुरातन नाव मणिभद्र आहे. टूरिस्ट येथे अलकनंदा आणि सरस्वती नदीचे संगम पाहायला येतात. त्याशिवाय गणेश गुफा, व्यास गुफा आणि भीमपुलदेखील आकर्षणाचे ठिकाण आहे.
येथे सरस्वती नदीवर 'भीम पुल' आहे. सांगितले जाते की, जेव्हा पांडव स्वर्गात जात होते, तेव्हा त्यांनी सरस्वती नदीकडे पुढे जाण्यासाठी रस्ता मागितला होते, पण जेव्हा नदिने नकार दिला तेव्हा भीमने दोन मोठ्या शिळा उचलल्या आणि नदीवर ठेवल्या, त्यामुळेच याला भीम पुल म्हणतात. या पुलावरूनच चालत पांडव स्वर्गात गेले होते.
एका अजून प्रचलीत गोष्टीनुसार, भगवान गणेश जेव्हा वेद लिहीत होते तेव्हा सरस्वती नदीच्या आवाजाने त्यांना त्रास होत होता तेव्हा त्यांनी सरस्वती नदीला विनंती केली की, आवाज कमी कर पण नदीने नकार दिला तेव्हा त्यांनी तिला श्राप दिला की, यानंतर तु कधीच कोणलाय दिसणार नाहीस तर व्यास गुफेबद्दल सांगितले जाते की, महर्षि वेद व्यास यांनी येथे वेद, पुराण आणि महाभारताची रचना केली आणि भगवान गणेशांनी ते लिहीले.
🚕असे जाऊ शकता माणा गावात
-- हरिद्वार आणि ऋषिकेशपासून माणा गावापर्यंत एनएच 58 वरून जाता येते.- -तेथून सगळ्यात जवळचे रेल्वे स्टेशन हरिद्वार आहे, जे 275 किलोमीटरवर आहे.
- -हरिद्वारवरून तुम्ही बस, टॅक्सी किंवा कॅबने माणा गावात जाऊ शकता.
=========================