सेन्सर चालकाला सांगेल, झोप आली, गाडी थांबव !

 सेन्सर चालकाला सांगेल, झोप आली, गाडी थांबव ! 

____________________________
🌀 माहिती सेवा ग्रूप 🌀
____________________________
दि. ११ एप्रिल २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3dQo3gJ
बर्याच वेळा रात्रीच्या प्रवासावेळी चालकाच्या डोळ्यावर झापड आल्यानेच अपघात होत असतात आणि अनेकांचे प्राण जातात. आता अशावेळी वाहनात बसवलेले सेन्सरच धोक्याचा इशारा देईल. छत्तीसगढमधील रायपूर एनआयटीमधील प्राध्यापक डॉ. मृदू साहू यांनी हे सेन्सर विकसित केले आहे. लवकरच ते बाजारातही उपलब्ध होईल. चालकाला झोप आल्यावर ते याबाबत सावध करून गाडी तत्काळ थांबवण्यास सुचवेल.       

       
╔══╗
║██║      M⃟   a⃟   h⃟   i⃟   t⃟   i⃟  
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
____________________________
डॉ. मृदू याबाबत चार वर्षांपासून काम करीत होते. आता अमेरिकेच्या कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी तयार केलेल्या सॉफ्टवेअरवर व त्यावर आधारित उपकरणाला अधिक अद्ययावत केले जात आहे. यावर्षीच्या जुलैमध्ये हे उपकरण बाजारात येऊ शकेल. मद्यपान करून वाहन चालवणार्यांना आणि झोपेत असलेल्या चालकांना जागे करण्याचे काम हे उपकरण करील. ही यंत्रणा वाहन चालकाची शारीरिक क्षमता, झोप, झोपेचा स्तर, शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण, मानसिक स्थिती आदींबाबतच्या नोंदी ठेवून त्याची माहिती देऊ शकेल. या सेन्सर डिव्हाईसला ‘आर प्रोग्रामिंग’ या नावाने तयार केले आहे. ते लर्निंग आणि व्हीजूअलायजेशनच्या तंत्रावर आधारित आहे. चालक झोपेत असेल तर डोळ्यातील रेटिनावरील प्रभावाच्या नोंदींवरून त्याबाबतची माहिती घेतली जाते. डुलकी येत असेल तर ते वाहनात अॅलर्ट जारीकरून त्याचा आवाज घुमू लागतो.
____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9011714634 ☜♡☞
➰ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव  ➰
_____________________
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने