आई ती आईच…पिल्लांना वाचवण्यासाठी कोंबडीची तीन सापांशी झुंज, पाहा व्हिडीओ

🟣आई ती आईच…पिल्लांना वाचवण्यासाठी कोंबडीची तीन सापांशी झुंज, पाहा व्हिडीओ🟣



http://bit.ly/3tW5Kgj
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*_ᘛ  माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव  ᘛ_*
         *दि. २  जून २०२१*
❢ सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे भन्नाट व्हिडीओ पाहायला मिळतात. यात कधी मजेदार व्हिडीओ असतात तर काहीवेळेला अचंबित करणारे व्हिडीओ पाहायला मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. एका कोंबडीने आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी सापांशी झुंज दिली आहे. हा व्हिडीओ पाहून आई ती आईच असते याची प्रचिती येत असून नेटकऱ्यांनीही या कोंबडीचे कौतुक केले आहे.



हा व्हिडीओ पाहून सगळ्यांची मनं कोंबडीने जिंकली आहेत. या व्हिडीओत कोंबडी आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी तीन विषारी सापांशी झुंज देत आहे. तिने पिल्लांना आपल्या पंखाखाली घेत त्या तिन्ही बाजूने जवळ येणाऱ्या सापांना चोच मारतेय. मात्र ती आपल्या पिल्लांचे संरक्षण करतेय. ते तीन साप तिच्यावर वारंवार हल्ला करतायत तरीही कोंबडी तिथेच तटस्थ उभी राहून त्यांचा सामना करतेय. कदाचित यालाच आईचं प्रेम म्हणतात.
http://bit.ly/3tW5Kgj
❢ हा व्हिडीओ ट्विटरवर आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत एक मजेदार कॅप्शन दिली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. आतापर्यंत तीन हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडतोय तसेच त्यावर लोकांच्या गमतीदार प्रतिक्रिया देत कोंबडीचे कौतुक केले आहे.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*_ᘛ  माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव  ᘛ_*
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने