मुलाच्या नावाने पीपीएफ खाते काढल्यास..
____________________________
माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव
╰──────•◈•──────╯
____________________________
.
कीर्ती कदम
आपला आयकर वाचवण्यासाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) मध्ये गुंतवणूक करणार्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. अन्य गुंतवणुकीपेक्षा या गुंतवणुकीवर अधिक दराने व्याज मिळते. त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करणार्या नोकरदार, व्यावसायिकांची संख्या वाढली आहे. आपल्याला आपल्या मुलांच्या नावाने पीपीएफ खाते काढता येते. आईला किंवा वडिलांना एकालाच मुलांच्या नावाने खाते काढता येते. सज्ञान नसलेल्या मुलाच्या नावाने खाते काढल्यास त्याचा लाभ पालकांना आयकरातून वजावट मिळण्यासाठी घेत आहेत. दोघांपैकी कोणत्याही एका व्यक्तीलाच असे खाते उघडता येते._
🌹...............................................
╔══╗
║██║ M⃟ a⃟ h⃟ i⃟ t⃟ i⃟
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
____________________________
🔹आवश्यक कागदपत्रे :
मुलाचा तसेच तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो बँकेकडे सादर करावा लागतो. मुलाचा जन्मदाखला अथवा शाळेचा दाखला सादर करावा लागतो. अशा गुंतवणुकीत पालकांना मुलांच्या नावाने दरवर्षी 1 लाखापर्यंत गुंतवणूक करता येते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट.
प्रतिज्ञापत्र आवश्यक :
मुलांच्या नावाने पीपीएफ अकाऊंट उघडताना पालकांना बँकेकडे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. त्यात आपल्या आणि लहान मुलांच्या नावाने असलेल्या बँक खात्यांचा तपशील द्यावा लागतो. आयकर कायदा कलम 80 सी प्रमाणे लहान मुलाच्या नावाने पीपीएफमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर 1 लाखापर्यंतचा क्लेम करता येतो. समजा पालकांचा मृत्यू झाला तर न्यायालयाकडून त्या खात्याचा पालक नियुक्त केला जातो. तो मुलगा सज्ञान झाल्यावर त्याला स्वत:च्या नावाने खाते उघडता येते.
____________________________
🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9011714634☜♡
माहिती सेवा ग्रूप
╰──────•◈•──────╯
🌹.............................................
. ണคн¡т¡ รεvค
. :::::∴━━━✿━━━∴::::
. *༺♥