येथील ‘बाप्पा’चा आकार रोज वाढतो?

येथील ‘बाप्पा’चा आकार रोज वाढतो?        



____________________________
 _माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव
──────•◈•──────╯
____________________________
.      दि.  २८  जून २०२०
  .  हैदराबाद :आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात कणिपक्कम विनायकाचे मंदिर आहे. गणपती बाप्पाचे हे प्राचीन मंदिर एका वेगळ्या वैशिष्ट्यामुळे प्रसिद्ध आहे. येथील बाप्पांच्या मूर्तीचा आकार वाढतच असतो, असे म्हटले जाते. बाप्पाला जे कवच चढवले जाते त्याचा आकार दरवर्षी लहान होतो व प्रत्येक वर्षी बाप्पाला नव्या आकाराचे नवे कवच चढवले जाते. विशेषतः पोट आणि गुडघ्याजवळचा भाग अधिक वाढल्याचे दिसून येत असल्याचे म्हटले जाते. मंदिराच्या गर्भगृहात बाप्पाचे असे अनेक कवच ठेवलेले आहेत व ते बाप्पाच्या वाढलेल्या आकाराचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते.   
कनिपक्कम येथील वाढणारा गणपती ,Does the size of 'Bappa' here increase every day?

  
.येथील गर्भगृहातील बाप्पाच्या मूर्तीचा आकार रोज वाढतो, असा तेथील भाविकांचा विश्वास आहे. या मंदिराची उभारणी अकराव्या शतकात चोल राजा कुलोठुन्गा चोल पहिला याने केली होती. त्यानंतर विजयनगर साम्राज्याच्या एका राजाने सन 1336 मध्ये या मंदिराला भव्य रूप दिले. गर्भगृहातील मूर्तीचीच एक प्रतिकृती मंदिरासमोरील तलावाच्या मध्ये निर्माण केलेल्या छोट्याशा मंदिरात दिसून येते. या गणेशाबद्दल दक्षिण भारतात अत्यंत श्रद्धेची भावना आहे. अनेक लोक या गणेशमंदिराला भेट देत असतात. मंदिरातील गणेशमूर्ती घडवलेली नसून महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच स्वयंभु आहे.
____________________________
🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498☜♡☞
माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव
╰──────•◈•──────╯

============================================== 

Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने