समुद्रात ब्रीज कसे उभारले जातात माहित आहे का?

🟣समुद्रात ब्रीज कसे उभारले जातात माहित आहे का?🟣


समुद्रात ब्रीज कसे उभारले जातात माहित आहे का?

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
ᘛ  माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव  ᘛ
         दि.१   जून २०२१
दोन ठिकाणांमधील अंतर कमी व्हावं आणि प्रवास सुखकर व्हावा यासाठी अनेक ठिकाणी मोठमोठे ब्रीज बांधल्याचं पाहायला मिळतं. या ब्रीजमुळे म्हणजेच पूलांमुळे वाहतूक करणं अत्यंत सोपं झालं असून व्यक्ती कमी कालावधीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज पोहोचते. हा प्रवास करत असतांना अनेकदा आपण सागरी ब्रीजवरुनही जात असतो. मात्र, पाण्याचा प्रवाह सुरु असतांना हे ब्रीज समुद्रात नेमके कसे बांधले जात असतील? हा प्रश्न नक्कीच काहींना पडला असेल. म्हणूनच, समुद्राच्या वाहत्या पाण्यात हे ब्रीज कसे उभारले जातात ते आज जाणून घेऊयात.
समुद्र किंवा नदीमध्ये उभारण्यात येणारे म्हणजेच बांधण्यात येणारे ब्रीज वेगवेगळ्या प्रकारचे असतात. यात साधारणपणे सस्पेंशन ब्रीज, बीम ब्रीज, कमान ब्रीज असे काही प्रकार आहेत. हे ब्रीज तयार करत असतांना प्रथम पाण्याची खोली, पाण्याचा प्रवाह, समुद्रातील मातीची गुणवत्ता आणि ब्रीज तयार झाल्यावर त्याच्यावर येणारा गाड्यांचा भार अंदाजे किती असेल याचा अभ्यास केला जातो.
http://bit.ly/3tW5Kgj
ब्रीज उभारतांना फाउंडेशन अत्यंत गरजेचं
पाण्यात ब्रीज उभारण्यापूर्वी त्याच फाउंडेशन व्यवस्थित तयार करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण, हे फाउंडेशनच ब्रीजचा महत्त्वपूर्ण भाग असतो. एकप्रकारे तो ब्रीजचा पायाच असतो. पाण्यात उभारण्यात येणाऱ्या या पायाला कॉफरडॅम (Cofferdam) असं म्हटलं जातं. स्टीलच्या मोठ्या प्लेटपासून हे कॉफरडॅम तयार केले जातात. त्यानंतर, मोठमोठ्या क्रेनच्या मदतीने हे कॉफरडॅम पाण्याच्या मध्यभागी ठेवले जातात. या कॉफरडॅमचा आकार गोल किंवा चौरस असतो. हे कॉफरडॅम बसवल्यानंतर पाणी त्याच्या बाहेरुन प्रवाहित होत असतं. परंतु, त्याच्या आता पाणी जात नाही. ज्यावेळी कॉफरडॅममधून समुद्राखालील माती दिसू लागते. त्यावेळी तेथे खांब तयार करण्याचं काम सुरु केलं जातं. हे खांब तयार झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ब्रीज तयार केला जातो.
दरम्यान, जर पाणी खोल असेल तर तेथे कॉफरडॅम वापरुन ब्रीज बांधता येत नाही. त्यासाठी प्रथम जमिनीखाली संशोधन करावं लागतं. जेथे माती चांगली असेल तिथे ब्रीजचं काम केलं जातं. ज्या ठिकाणी जमीन चांगली असते तेथे खड्डे खणून पाईप्स टाकले जातात. त्यानंतर या पाईप्समधून पाणी काढलं जातं व त्या पाईपमध्ये सिमेंट व अन्य वस्तू टाकल्या जातात. असे अनेक पाईप्स एकत्र केल्यानतंर मग पिलर उभारले जातात.
असा तयार होतो ब्रीज
ब्रीज तयार करण्यासाठी लागणारं सारं काम हे अन्य ठिकाणी केलं जातं. त्यानंतर, तयार झालेले ब्लॉक दोन्ही खांबादरम्यान लावून त्यापासून ब्रीज तयार केला जातो.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
ᘛ  माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव  ᘛ
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने