अरे व्वा! फक्त चॉकलेट खा आणि घरबसल्या लाखो रुपये कमवा; "या" कंपनीने दिली हटके जॉबची ऑफर

🟣अरे व्वा! फक्त चॉकलेट खा आणि घरबसल्या लाखो रुपये कमवा; "या" कंपनीने दिली हटके जॉबची ऑफर🟣

||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍    
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||           
                
  
          ❍ दिनांक -  २६ जानेवारी  २०२१
----------------------------------------
चॉकलेट खाण्याचे अनेकजण शौकीन असतात. नुसतं नाव घेतलं तरी काहींच्या तोंडाला पाणी सुटतं. अवघ्या पाच रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत चॉकलेटसाठी पैसे मोजावे लागतात. मात्र तुम्हाला जर कोणी चॉकलेट खा आणि लाखो रुपये कमवा असं सांगितलं. तर सुरुवातीला तुमचा विश्वासच बसणार नाही पण हो हे खरं आहे. चॉकलेट प्रेमींसाठी एक खूशखबर आहे. कारण आता चॉकलेट, टॉफी खाण्यासाठी पैसे मिळत आहेत. एका कंपनीने या हटके जॉबची ऑफर दिली आहे. यामध्ये टॉफीची चव सांगणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत असून यासाठी त्याला भलामोठा पगार देखील दिला जाणार आहे. 


कँडी फनहाऊस (Candy Funhouse) या टॉफी कंपनीने हा हटके जॉब ऑफर केला आहे. ही कंपनी कॅनडातील ओंटारिओच्या सिनिसाऊगा शहरामध्ये आहे. या जॉबची खासियत म्हणजे जगात तुम्ही कुठेही असाल तरी या कंपनीसाठी काम करू शकता. या कंपनीला त्यांनी बनवलेली टॉफी खाण्यासाठी फुल टाइम आणि पार्ट टाइम कर्मचारी हवे आहेत. जे कंपनीने तयार केलेली टॉफीज खाऊन त्याच्या चवीची माहिती हे जगाला देऊ शकतील. कंपनीने यासाठी खास जाहिरात दिली आहे. या जाहिरातीनुसार कंपनीला कँडिओलॉजिस्ट (Candyologist) पदासाठी लोक हवे आहेत.
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/   *❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा ❍*
----------------------------------------
टॉफी कंपनीने तयार केलेल्या टॉफीची चव चाखणं हे या कँडिओलॉजिस्ट काम असेल. कंपनीने आपल्या जाहिरीतीत दिलेल्या माहितीनुसार, कँडिओलॉजिस्टचं काम करणाऱ्याला व्यक्तीला कंपनी एका तासासाठी 47 डॉलर देणार आहे. म्हणजे तुम्ही 8 तास काम केलं तर तुम्हाला 376 डॉलर्स मिळू शकता. म्हणजे दिवसाला तुम्ही 27,447 रुपये कमवू शकता आणि महिन्याला  8,23,410 रुपयांची कमाई करू शकता. जर वर्षाचा विचार केला तर तुमचा वार्षिक पगार 98,80,920 रुपये होईल. विशेष म्हणजे कँडी फनहाऊसने घरबसल्या हे काम करण्याची परवानगी दिली आहे.


कँडी फनहाऊस कंपनीचं प्रोडक्ट टेस्ट करायचं आहे आणि यामध्ये काय चांगलं आहे, काय वाईट आहे ते सांगायचं आहे. यामध्ये कोणत्या प्रकारच्या फ्लेव्हरचा वापर केला जाऊ शकतो हे देखील तुम्हाला सांगायचं आहे. विशेष म्हणजे जगात कुठेही असाल तरी तुम्ही हे काम करू शकता. यासाठी तुम्हाला कंपनीत जाण्यासाची गरज नाही. तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. कँडी फनहाऊसने आपल्या वेबसाईटवर या जॉबची ऑफर दिली आहे. यासाठी अर्ज करण्याची मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत आहे. कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही नोकरीसाठी अर्ज करू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑  9011714634  𝐕𝐢𝐤𝐢 ✺
                  ❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर 
----------------------------------------
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने