घरबसल्या बनवा पॉकिटमध्ये ठेवता येणारं नवीन Aadhaar PVC Card,

घरबसल्या बनवा पॉकिटमध्ये ठेवता येणारं नवीन Aadhaar PVC Card,                  

        
घरबसल्या बनवा पॉकिटमध्ये ठेवता येणारं नवीन Aadhaar PVC Card,

आधार कार्ड हल्ली बऱ्याच ठिकाणी महत्त्वाचे कागदपत्र म्हणून विचारले जाते. कोणत्याही महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्डची गरज असते. नवीन आधार कार्ड सर्वत्र आवश्यक असून, ते आपल्यासाठी अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणून देखील कार्य करते. तसेच सर्वत्र त्याची मागणी केली जाते. अशा सर्व गरजा लक्षात घेऊन UIDAI ने अलीकडेच आधार पीव्हीसी कार्ड नावाचे नवीन आधार कार्ड जारी केले होते. हे प्लास्टिकपासून तयार केलेले असून, एकत्र ठेवणे सोपे आहे. हे डेबिट कार्डसारखे आहे, जे सहजपणे पाकिटात ठेवता येते. 
आपल्यालाही आधार पीव्हीसी कार्ड बनवायचे असेल तर हे काम आता सहजसोपे झालेय. हे काम घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करता येते. यासाठी प्रथम UIDAI च्या संकेतस्थळावर जा https://resident.uidai.gov.in येथे माय आधारच्या पर्यायावर क्लिक करा. ऑर्डर आधार पीव्हीसी कार्डवर क्लिक करा. ही सशुल्क सेवा आहे आणि त्यासाठी तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील. यात जीएसटी आणि इतर सर्व शुल्काचा समावेश असेल.
ऑर्डर कशी करावी?
आपल्यासमोर जे पृष्ठ उघडणार आहे, तेथे आपल्याला 12 अंकी आधार क्रमांक, 16 अंकी व्हर्च्युअल आयडी क्रमांक किंवा 28 अंकी नोंदणी क्रमांक मार्गे लॉग इन करावे लागेल. नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपीमार्फत पडताळणी करावी लागेल. जर मोबाईल नंबरची पडताळणी केली नसेल तर एक पर्याय आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, मोबाईल नंबर नोंदणीकृत नाही. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पैसे भरणे आवश्यक आहे आणि हे कार्ड स्पीड पोस्टवरून कामकाजाच्या पाच दिवसांत नोंदणीकृत पत्त्यावर वितरीत केले जाते.
स्टेटस कसे ट्रॅक करावे?
जर आपण यासाठी अर्ज केला असेल आणि स्टेटसचा मागोवा घ्यायचा असेल तर माय आधारवर क्लिक करा आणि येथे आपल्याला आधार पीव्हीसी कार्डची स्थिती तपासण्याचा पर्याय मिळेल. आधार नंबर आणि ओटीपीद्वारे आपल्याला ट्रॅकिंगची स्थिती जाणून घेता येईल.
आधार पीव्हीसी कार्डची वैशिष्ट्ये
सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते सोबत बाळगणे खूपच सुरक्षित आणि सुलभ आहे. हे आपल्या डेबिट आणि पॅन कार्डसारखे आहे, जे आपण आपल्या पाकिटात ठेवू शकता. सुरक्षेविषयी बोलताना यात क्यूआर कोड, होलोग्राम, Guilloche Pattern, घोस्ट इमेज अशी वैशिष्ट्ये आहेत.
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने