🟣13 हजार किमीचा प्रवास करून अमेरिकेतून आलेल्या ‘या’ कबुतराचा ऑस्ट्रेलियाला घ्यायचा आहे जीव, जाणून घ्या🟣
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍
❍ दिनांक - २२ जानेवारी २०२१
----------------------------------------
पांढर्या कबूतराचे सौंदर्य सर्वांना त्याच्याकडे आकर्षित करते. तथापि, ऑस्ट्रेलियामध्ये असाच एक पांढरा कबूतर सध्या जैविक सुरक्षेसाठी धोकादायक बनला आहे. ऑस्ट्रेलियन सरकारचा असा विश्वास आहे की, या एका कबुतराच्या आगमनामुळे संपूर्ण ऑस्ट्रेलियामध्ये रोग पसरू शकतात. या कबूतराची खास बाब म्हणजे अमेरिकेपासून ते ऑस्ट्रेलियापर्यंत 13 हजार किलोमीटरचा प्रवास करून हा कबूतर येथे दाखल झाला आहे.
वृत्तसंस्था एपीच्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हा पांढरा कबूतर अमेरिकेच्या ओरेगॉनमधील कबूतर शर्यतीत सामील झाला होता. या शर्यती दरम्यान, कबूतर भरटकला आणि ऑस्ट्रेलियात पोहोचण्यासाठी अनेक हजार किलोमीटरचा प्रवास केला. या कबुतराचे नाव आहे ‘जो’. जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये हा कबूतर पकडला गेला तेव्हा त्याच्या पायात निळ्या रंगाचा पट्टा बांधलेला होता. हा पट्टा या कबुतराला शर्यतीमध्ये तो ओळखू यावा यासाठी बांधण्यात आला. असं सांगितलं जात आहे की, हा कबूतर 13 हजार किलोमीटरचा प्रवास करून 26 डिसेंबरला मेलबर्नला पोहोचला.
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/ *❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा ❍*
----------------------------------------
पांढर्या कबुतराच्या पायाशी बांधलेल्या या निळ्या पट्ट्यामुळे ऑस्ट्रेलिया सरकार अडचणीत सापडले आहे. ऑस्ट्रेलियन सरकारला असे वाटते की, हा कबूतर एक मोठा रोग पसरविण्यासाठी पुरेसा आहे, म्हणून या कबुतराला मारले होईल. तथापि, ऑस्ट्रेलियन सरकारने घेतलेल्या या निर्णयापाठोपाठ अमेरिकेतील अमेरिकन रेसिंग कबूतर संघटनेचे क्रीडा विकास व्यवस्थापक, डीओन रॉबर्ट्स म्हणाले की, कबूतरच्या पायाला बांधलेला निळा बँड फेक आहे.
डीओन रॉबर्ट्स म्हणाले की, ऑस्ट्रेलियामध्ये सापडलेले हे कबूतर अमेरिकन निळ्या रंगाच्या बॅंडेड कबूतरांपेक्षा वेगळे आहे. ते म्हणाले की, आम्ही अद्याप शर्यतीमध्ये सामील झालेल्या कबूतराचा शोध घेऊ शकलेलो नाही. मात्र आपण असे म्हणू शकतो की, हा कबूतर ऑस्ट्रेलियाचाच आहे. ते म्हणाले की, जर हा शर्यतीतील कबूतर असता तर आम्ही त्याच्या बँडद्वारे त्याला ओळखले असते. ऑस्ट्रेलियाच्या कृषी विभागाने अद्याप हे सांगितले नाही की त्याचा बँड बनावट असल्यास त्याला मारले जाईल की नाही .
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 9011714634 𝐕𝐢𝐤𝐢 ✺
*_❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
----------------------------------------