खरं वाटणार नाही पण, कोणतेही व्यसन नसले तरीही या ११ गोष्टींमुळे होऊ शकतो कॅन्सर!

खरं वाटणार नाही पण, कोणतेही व्यसन नसले तरीही या ११ गोष्टींमुळे होऊ शकतो कॅन्सर!

-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍   
----------------------------------------       
  
                   
          ❍ दिनांक - १६ डिसेंबर  २०२०
----------------------------------------
कॅन्सर हा एक भयानक आजार आहे. एकदा जर तो आजार जडला की त्यातून वाचणे खूप कठीण असते. त्यामुळे जगभरात अनेक माध्यमांतून कॅन्सर संबंधी जागरूकता पसरविली जाते. कारण त्यापासून वाचण्याचा सर्वात खात्रीशीर मार्ग आहे – तो म्हणजे कॅन्सर न होणे.
पण आजही या आजाराबद्दल हवी तेवढी जागरूकता नाहीये.
‘तंबाखुचे सेवन आपल्या आरोग्यासाठी अपायकारक आहे, त्याने कॅन्सर होऊ शकतो’, हे वाक्य आपण आपल्याला बिडी-सिगरेटच्या प्रत्येक पाकिटावर लिहिलेलं आढळते.
पण फक्त तंबाखुनेच कॅन्सर होतो काय? तर नाही.
याशिवाय देखील अनेक अश्या गोष्टी आहेत ज्या कॅन्सर होण्याला कारणीभूत ठरतात.
त्यातल्या काही आपल्या जीवनातील दैनंदिन गोष्टी आहेत आणि या गोष्टींमुळे देखील कॅन्सर होऊ शकतो.
वाईन :


एकीकडे वाईनला आपल्या आरोग्यासाठी चांगले मानल्या गेले आहे, तर दुसरीकडे एका थेअरीनुसार वाईनचे सेवन केल्याने कॅन्सर होण्याचा धोका दुप्पट असतो.
या शोधानुसार दररोज अर्धा ग्लास वाईनचे सेवन केल्याने कॅन्सर होण्याचा धोका १६० टक्क्यांनी वाढतो.
डियोड्रंट :


डियोड्रंटमध्ये असणारे अॅल्युमिनियम तत्वांमुळे ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका असतो. कारण डियोड्रंट हा तुमच्या त्वचेवर तसेच लावण्यात येणाऱ्या अंगांवर सरळ प्रभाव करतो.
चिप्स :


चिप्स (वेफर्स) आवडत नाही असा माणुस शोधूनही सापडणार नाही. पण तुम्हला हे माहित आहे का की, यामुळे देखील तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो.
याच्या अति सेवनाने तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. रिसर्च नुसार ५ पेक्षा जास्त वेळा चिप्स खाल्ल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका २७ टक्क्यांनी वाढतो.
ओरल सेक्स :


आजकालच्या तरुणांमध्ये ओरल सेक्सचं प्रमाण वाढलं आहे.पण सेक्सवर झालेल्या एका स्टडीमध्ये असे दिसून आले की, पुरुष आणि महिला दोघांतही ओरल सेक्समुळे घश्याचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.त्यामुळे याकरिता आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
हेयर कलर 


हेअर कलर म्हणजेच केसांना रंगवणे. आधी केवळ वय लपविण्यासाठी या हेअर कलर्सचा वापर करण्यात येत होता. पण आता तर केस रंगवणे म्हणजे ट्रेंड झाला आहे.
पण तुम्हाला माहित आहे का – की, १५ वर्षांहून जास्त काळ हेअर कलर्सचा वापर केल्याने गॉल ब्लॅडरचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/   *❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा ❍
----------------------------------------
सन स्क्रीन :


सन स्क्रीन, सूर्याच्या किरणांपासून वाचण्याकरिता अनेक लोकं सन स्क्रीनचा वापर करतात. पण हे सन स्क्रीन तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. याने त्वचेचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.
मोबाईल फोन :


१० मिनिटांपेक्षा जास्त काळ मोबाईल वापरल्याने डोक्याच्या सेल्सवर वाईट परिणाम होतो.याने कॅन्सरचा धोका वाढतो. तर अनेक वेळा यामुळे ब्रेन ट्युमर होण्याचा धोका देखील वाढतो.
रेड मीट :


एका रिसर्चनुसार असे कळाले की, जे लोकं मिट, बीफ, चिकन याचे अति प्रमाणात सेवन करतात त्यांना लंग कॅन्सर म्हणजेच फुफ्फुसाच्या कॅन्सर लवकर होतो.
विटामिन ई :


७७ हजार लोकांवर करण्यात आलेल्या एका रिसर्च नुसार असे दिसून आले की, अति प्रमाणात विटामिन-E चे अवशोषण केल्याने कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.
कारण, अति प्रमाणातील विटामिन-ई शरीरातील ब्रिटॉनला दर १५ मिनिटांत संपवते.
ज्यामुळे फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याची शक्यता संभावते.
कुकीज किंवा बेकरी प्रोडक्ट्स :


कुकीज किंवा बेकरी प्रोडक्ट्स मध्ये अनेक प्रकारचे रसायन मिसळले जाते. जेणेकरून या वस्तू जास्त काळ टिकतील, खराब होणार नाहीत.
पण हे रसायन आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असतात. यांमुळे देखील कॅन्सर होण्याची शक्यता असते.
माऊथवॉश :


माऊथवॉश हे मौखिक स्वच्छतेसाठी गरजेचे म्हणून वापरले जाते. पण हेच माऊथवॉश आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे. वैज्ञानिकांनुसार माऊथवॉश मध्ये अल्कोहोल असते ज्यामुळे तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
थोडक्यात सांगायचं झालं कुठल्याही गोष्टीचे अति सेवन अथवा वापर हे अपायकारकच…
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑  9011714634  𝐕𝐢𝐤𝐢 ✺
                  *_❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
----------------------------------------
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने