घड्याळातील वेळ १०:१० दाखवण्यामागचं ‘हे’ कारण

जाहिरातीत घड्याळातील वेळ १०:१० दाखवण्यामागचं कारण 

-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍    
----------------------------------------           
                 
          ❍ दिनांक - २८ नोव्हेंबर २०२०
----------------------------------------
 घड्याळ्याच्या दुकानामध्ये तुम्ही पाहिलं असेल की घड्याळं ही १०:१० या स्थितीमध्ये सेट असतात.हे असं का? यामागचं कारण तुम्ही देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला असेल आणि तुम्हाला उत्तर देखील मिळाली असतील.
पण खरं सांगायचं तर तुमच्या कानी पडलेली उत्तरे ही बहुतके अफवा असू शकतात, कारण या मागे नक्की काय आहे हे अजूनही लोकांना माहित नाही,यामुळे कोणीही काहीही उत्तर बनवून ती पसरवली.
आज आम्ही तुम्हाला या कोडयामागचं खरं उत्तर सांगणार आहोत.सर्व प्रथम आपण या मागच्या अफवा जाणून घेऊ या.
अनेकजण असे म्हणतात की १०:१० वेळेला अब्राहम लिंकन यांनी अखेरचा श्वास घेतल्याने घड्याळं १०:१० वर सेट केलेली असतात.
पण खरंतर लिंकन यांना रात्रीच्या १०:१५ मिनिटांनी गोळी मारली गेली आणि सकाळी ७:२२ ला त्यांचा मृत्यू झाला.
तयामुळे लिंकन यांच्या मृत्यूमुळे घड्याळं १०:१० वर सेट करण्याची प्रथा सुरु झाली असे म्हणणे चुकीचे ठरते.
घड्याळं १०:१० वर सेट असण्यामागची अजून एक अफवा म्हणजे १०:१० वेळेला नागासाकी आणि हिरोशिमा शहरांवर अणुबॉम्ब पडला म्हणून घड्याळं १०:१० वर सेट केली जातात.
पण कागदपत्र सांगतात की फॅट मॅन बॉम्ब आणि लिटील बॉय बॉम्ब हे या शहरांवर १०:१० या वेळेला पडलेच नाहीत.
जर तुम्हाला देखील कोणी अशी उत्तरे दिली असतील तर ती विसरून जा, कारण आम्ही तुम्हाला आता त्यामागचं खरं कारण सांगत आहोत.
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/   ❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा ❍
----------------------------------------
यामागचं खरं कारण आहे – सौंदर्यशास्त्र…!
घड्याळ १०:१० या स्थितीमध्ये सेट असल्यास त्यामुळे घड्याळाला अनेक फायदे होतात.
१०:१० वर घड्याळ सेट असल्याने त्याचे काटे स्वतंत्र असतात. म्हणजे आपण दोन्ही काटे पाहू शकतो आणि घड्याळाकडे पाहिल्यावर ते सरळ नजरेत भरतात.
या खास शैलीमुळे घड्याळाला एक सौंदर्य शैली प्राप्त होते. जर हेच घड्याळाचे काटे एकमेकांवर असतील किंवा १०:१० च्या उलट स्थितीमध्ये असतील तर ते नजरेलाही छान वाटत नाहीत.
दुसरं म्हणजे घड्याळ बनवणाऱ्या कंपनीचा लोगो हा १२ च्या खाली आणि मधोमध असतो.
तो लोकांना अगदी योग्यरीतीने दिसावा म्हणून १०:१० या स्थितीपेक्षा दुसरी उत्तम स्थिती नाही. ही स्थिती लोगोच्या आड बिलकुल येत नाही.
तसंच घड्याळामध्ये विंडोज, सेकंडरी डायल्स यांसारख्या गोष्टी असल्यास त्या सहसा ३, ६ किंवा ९ या आकड्यांच्या आसपास असतात.
त्यामुळे घड्याळ १०:१० च्या स्थितीमध्ये असल्याने ते देखील पाहणाऱ्याला अगदी स्पष्ट दिसतात.
अजून एक महत्वाचं कारण म्हणजे –
१०:१० ही स्थिती आनंदी चेहऱ्यासारखी भासते (म्हणजे घड्याळ हसत आहे असा एक भास निर्माण होतो.) तसेच ही स्थिती विक्टरी/विजय अर्थात V या चिन्हासारखी भासते. जी एक सकारात्मक गोष्ट मानली जाते.
Timex कंपनी त्यांच्या प्रोडक्ट्स मध्ये पूर्वी ८:२० या स्थितीमध्ये घड्याळाचे काटे सेट करायची.
पंण ते सौंदर्यशास्त्राच्या उलट असल्यामुळे आणि त्यांना नंतर १०:१० स्थितीचे महत्त्व पटल्यामुळे त्यांनी देखील आपल्या घड्याळातील काट्यांची स्थिती १०:१० वर सेट करायला सुरुवात केली.
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑  9011714634  𝐕𝐢𝐤𝐢 ✺
                  ❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
----------------------------------------
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने