गोष्ट त्या रात्रीची... ! पहाटे 3 वाजेपर्यंत ऐश्वर्याचे दार ठोकत राहिला सलमान खान, पण...
-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍
❍ दिनांक - १ नोव्हेंबर २०२०
----------------------------------------
ऐश्वर्या राय व सलमान खानची लव्हस्टोरी ही बॉलिवूडची सर्वात गाजलेली लव्हस्टोरी. या लव्हस्टोरीचे किस्से आजही चर्चेत असतात. सलमान खान तसा ‘दबंग खान’ म्हणून ओळखला जातो. पण प्रेमाच्या आगीत तो असा काही होरपळा की, बघता बघता हिरोचा विलेन बनला. एकेकाळी ऐश्वर्या व सलमान एकमेकांवर जीवापाड प्रेम करत. पण आज दोघेही एकमेकांचे नाव घेणेही टाळतात. आज ऐश्वर्या रायचा वाढदिवस. अशात तिच्या व सलमानच्या लव्हस्टोरीचा हा किस्सा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
तर घटना आहे 1999 सालच्या एका रात्रीची. या रात्री असे काही घडले की, सलमान व ऐश्वर्याचे नाते कायमचे संपुष्टात आले.
सलमान व ऐश्वर्या जवळपास तीन वर्षे एकत्र होते.1997 साली या लव्हस्टोरीची सुरुवात झाली होती. ऐश्वर्या इंडस्ट्रीत नवखी होती. याच काळात सलमान तिच्या आयुष्यात आला. खरे तर सलमान त्यावेळी सोमी अलीच्या प्रेमात होता. तिच्यासोबत लग्नही करणार होता. पण ऐश्वर्याला पाहिले आणि तिच्यासाठी तो असा काही वेडा झाला की, सोमीला सुद्धा विसरला.
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/ *❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा ❍
----------------------------------------
असे म्हणतात की, सलमानने ऐश्वर्याच्या करिअरची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. ऐश्वर्याला ‘हम दिल दे चुके सनम’ मिळाला तोही सलमानच्या शिफारसीमुळे. याच सिनेमाच्या सेटवर सलमान व ऐश्वर्याची लव्हस्टोरी बहरली. इतकी की, सलमानचे मित्र ऐश्वर्याला वहिनी म्हणून बोलवू लागले होते. पण त्या रात्री असे काही घडले की, ही लव्हस्टोरी कायमची संपली.
चर्चा खरी मानाल तर, एक दिवस अर्ध्या रात्री सलमान ऐश्वर्याच्या घरी पोहोचला आणि जोरजोरात दरवाजा ठोकू लागला. सलमान प्रचंड रागात होता आणि ऐश्वर्या दरवाजा उघडत नव्हती. प्रत्यक्षदर्शींनी त्यावेळी सांगितल्यानुसार, पहाटे 3 वाजेपर्यंत सलमान ऐश्वर्याच्या दरवाज्यावर जोरजोरात थापा मारत होता. त्याच्या हातातून रक्त येऊ लागले, तरी तो थांबायला तयार नव्हता. दोन-तीन तास हा ड्रामा सुरु होता. अखेर ऐश्वर्याने दरवाजा उघडला आणि सलमान घरात गेला.
इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार, दोघांच्या नात्यात कटुता येण्यामागचे कारण होते लग्न. सलमानने लग्नसाठी तगादा लावला होता. पण ऐश्वर्या त्यासाठी तयार नव्हती. तिला करिअरवर फोकस करायचा होता.
काही लोकांच्या मते, सलमान व ऐश्वर्याच्या बे्रकअपसाठी सोमी अली जबाबदार होती. सोमीच्या वडिलांची प्रकृती बरी नव्हती. अशात तिने मदतीसाठी सलमानला फोन केला आणि सलमानही तिचा फोन येताच तडक अमेरिकेला पोहोचला होता. ऐश्वर्याला ही गोष्ट चांगलीच खटकली होती. याच कारणामुळे तिने सलमानसोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 9011714634 𝐕𝐢𝐤𝐢 ✺
❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
----------------------------------------