💥 व्हायरल सत्य 💥
केंद्र सरकार दर महिन्याला मुलींच्या बँक खात्यात 2500 रुपये टाकते?; जाणून घ्या...
-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍
❍ दिनांक - १७ नोव्हेंबर २०२०
----------------------------------------
केंद्र सरकारच्या योजनांच्या (Central Government Scheme) नावाखाली बऱ्याच लोकांकडून फसवणूकसुद्धा केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. केंद्राच्या नावाने बनावट व्हिडीओ किंवा बनावट संदेश व्हायरल करून (बनावट व्हिडिओ / बातम्या / संदेश) काही जण लोकांना गंडा घालत आहेत. सामान्य लोकांना त्यांची वैयक्तिक आणि बँकेची माहिती देण्यास सांगून फसवले जात आहे. अशा पद्धतीनं आतापर्यंत अनेक जणांना चुना लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे बर्याच वेळा लोकांची बँक खाती अशा चोरांनी रिकामी केली आहेत. आता केंद्र सरकारच्या योजनांच्या नावाखाली व्हिडीओ दाखवूनही फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोने (PIB) लोकांना अशाच एका बनावट व्हिडीओ आणि बातम्यांसंबंधी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/ ❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा ❍
----------------------------------------
व्हिडीओ दाखवून केली जातेय फसवणूक
पीआयबीने ट्विट केले आहे की, ‘एका व्हायरल व्हिडीओमध्ये असे सांगितले जात आहे की, केंद्र सरकार प्रत्येक मुलीच्या बँक खात्यात दरमहा 2500 रुपये ट्रान्सफर करत आहे. ही माहिती पूर्णपणे बनावट आणि दिशाभूल करणारी आहे. केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना चालविली जात नाही. खरं तर एका यू ट्युब व्हिडीओमध्ये (Youtube Video) असा दावा करण्यात आला आहे की, केंद्र सरकारने कन्या सन्मान योजने (Kanya Samman Yojana) अंतर्गत मुलींच्या बँक खात्यात दरमहा 2,500 रुपये जमा केले आहेत.
पीआयबीने लोकांना दिला हा सल्ला
#PIBFactCheck मध्ये हा व्हिडीओ बनावट असल्याचे आढळले आहे. पीआयबीने अशा कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी लोकांना चौकशी करण्याचा सल्ला दिला आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रत्येक योजनेची माहिती संबंधित मंत्रालयाने यापूर्वीच जाहीर केली आहे. म्हणूनच मंत्रालयाची वेबसाइट, पीआयबी आणि प्रत्येक योजनेशी संबंधित इतर विश्वासार्ह वाहिन्यांची तपासणी केल्यानंतरच अर्ज करा. काही बनावट बातम्या आल्या तर तुम्हाला नफ्याऐवजी आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो, असा सल्लावजा इशाराही पीआयबीनं दिला आहे.
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 9011714634 𝐕𝐢𝐤𝐢 ✺
*_❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
----------------------------------------