प्राॅव्हिडंट फंड अकाऊंटमधून आताही काढू शकता.'अ‍ॅडव्हॉन्स

प्राॅव्हिडंट फंड अकाऊंटमधून आताही काढू शकता 'अ‍ॅडव्हॉन्स'; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया...

-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍   
----------------------------------------         
                   
          ❍ दिनांक - ५ आॅक्टोंबर २०२०
----------------------------------------
कोरोना व्हायरसच्या महामारीनंतर लगेचच केंद्र सरकारने कर्मचार्‍यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून (EPF - Employee Provident Fund) अ‍ॅडव्हॉन्स (आगाऊ) रक्कम काढण्याची परवानगी दिली. मात्र, केंद्र सरकारने लॉकडाऊन आणि त्यानंतर पैशांची अडचण होऊ नये, यासाठी ही सूट काही निश्चित कालावधीसाठी दिली होती. केंद्र सरकारने नियम शिथिल केल्यानंतर ईपीएफओच्या (EPFO) कक्षेत आलेल्या कर्मचार्‍यांनीही याचा लाभ घेतला.
ईपीएफओने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मार्चच्या अंतिम आठवड्यापासून 38,71,664 लोकांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून 44,054.72 कोटी रुपये काढले आहेत. कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले की, पैसे काढण्यासाठी कोविड-19 संबंधित क्लेमचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातूनच 25 मार्च ते 31 ऑगस्ट या कालावधीत 7,23,986 कर्मचार्‍यांनी जवळपास 8,968.45 कोटी रुपये काढले आहेत.
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/   *❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा ❍
----------------------------------------
आता 1 सप्टेंबरनंतर पीएफ खात्यातून (PF Account) ही अ‍ॅडव्हॉन्स रक्कम काढण्यासाठी सरकारची सूट कालबाह्य झाली आहे. अशा परिस्थितीत आता तुम्ही या स्कीमअंतर्गत पीएफ खात्यातून पैसे काढू शकत नाही. मात्र, कर्मचार्‍यांना अद्याप त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढण्याचा पर्याय आहे. पण, हा सरकारच्या या अॅडव्हान्स विड्रॉल स्कीमच्या माध्यमातून नाही. तर पीएफ खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया अशी आहे...
1) कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्यासाठी आधी तुम्हाला ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन लॉगिन करावे लागेल. तुम्ही आपल्या यूएएन आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करू शकता. तुमचे पीएफ खात्याशी आधार कार्ड लिंक केलेले पाहिजे.
2) या पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर Online Service वर क्लिक करा आणि Claim (Form-31, 19 & 10C) ला निवडा.
3) पुढील स्टेपमध्ये तुमचे बँक खाते क्रमांक द्यावा लागेल आणि त्यानंतर Verify वर क्लिक करावे लागेल. यानंतर पुन्हा Yes वर क्लिक करा. आता Proceed For Online Claim वर जा.
4) पैसे ऑनलाइन काढण्यासाठी पीएफ अ‍ॅडव्हान्स (Form 31) निवडा. आता याठिकाणी तुम्ही पैसे कोणत्या कारणासाठी काढत आहात ते नमूद करावे लागेल. कारण आणि कर्मचाऱ्याची माहिती पत्ता भरल्यानंतर अर्ज करा.
5) पैसे काढण्याच्या कारणाशी संबंधित कागदपत्रांची स्कॅन कॉपी तुम्हाला सादर करावी लागेल. ईपीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या नियोक्ता / कंपनीकडूनही मंजुरी घ्यावी लागते.
6) यानंतर तुमचे पैसे बँक खात्यात जमा होतील. आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर याविषयी मेसेज पाठविला जाईल. बँक खात्यात पैसे हस्तांतरित करण्यासाठी एक निश्चत कालावधी लागतो.
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑  9011714634  𝐕𝐢𝐤𝐢 ✺
                  ❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
----------------------------------------
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने