या मंदिराच्या खांबांतून येतो आवाज. प्राचीन स्थापत्यशास्त्राचा अनोखा आविष्कार!
-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍
❍ दिनांक - २८ आॅक्टोंबर २०२०
----------------------------------------
भारताला मंदिरांचा सुंदर वारसा लाभलेला आहे. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत अवघ्या भारत भर वेगवेगळी वैशिष्ट्ये असलेली मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिर हे भारतीय प्राचीन वास्तुशास्त्र किती प्रगत होती ह्याचे प्रतीक आहे.
आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. ह्या विविधतेतही एकता आहे, समानता आहे. नाना प्रकारची लोकं येथे राहतात. साहजिकच येथे “व्यक्ती तितक्या प्रकृती” ह्या म्हणीप्रमाणे प्रत्येकाचे आराध्य दैवत वेगवेगळे आहे.
असं म्हटलं जातं की ३३ कोटी देवता आहेत. भारतात आस्तिक आणि श्रद्धाळू लोकांची संख्या खूप मोठी आहे.
अगदी हजारो वर्षांपूर्वीची मंदिरं आहेत जी तेव्हाच्या भारतीय संस्कृतीची, सभ्यतेची, इतिहासाची आणि संस्कारांची आजही साक्ष देतात आणि भाविक आजही भक्ती भावाने ह्या मंदिरांमध्ये दर्शनाला जातात.
इतकी परकीय आक्रमणे झाली. ही मंदिरे नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण, अजूनही ही देवळे तेवढ्याच डौलाने, वैभवाने उभी आहेत.
मंदिरांचे बांधकाम, स्थापत्य वैशिष्ट्यपूर्ण आहे, काही एकाच दगडातून कोरली आहेत तर काहींना आंतरराष्ट्रीय स्थापत्यशास्त्र म्हणून मान्यता मिळाली आहे.
ओरिसाचे कोणार्क मंदिर, त्रिवेंद्रम येथील श्री पद्मनाभ मंदिर, तिरुपती बालाजी मंदिर, शिर्डीचे साईबाबांचे मंदिर इत्यादी अनेक मंदिरे अद्भूत, स्थापत्यशास्त्राची उत्कृष्ट उदाहरणे आहेत.
भारतातील बरीचशी मंदिरे चमत्कारपूर्ण आहेत, काही मंदिरातील मूर्ती विलक्षण आहेत. भारतात शंकराच्या प्रत्येक मंदिराबाबत काहीतरी गूढ आहे.
“केदारनाथ प्रलयामध्ये तेथील गावे उध्वस्त झाली परंतु तिथल्या मंदिराला तसूभर ही धक्का लागला नाही हे सगळ्या जगाने पाहिले” तसेच प्रत्येक शंकराचे मंदिर हे विशिष्ट आहे.
आज ह्या लेखात आपण जाणून घेणार आहोत अशाच एका शंकराच्या मंदिराबाबत. ह्या मंदिराची खासियत अशी की इथल्या खांबांमधून सांगीतिक आवाज येतो.
मंदिराचा इतिहास
*दक्षिण भारतात शंकराची अनेक मंदिरे आहेत आणि त्यातील तिरुनलवेलीचे मंदिर हे बाकी च्या मंदिरापेक्षा एकदम वेगळे ठरते ते त्या मंदिरातील म्युझिकल पिलर मुळे…!!*
भगवान शंकर हे अनादी अनंत आहेत म्हणजे ज्याची न सुरुवात आहे ना अंत. भगवान शंकराचे नटराज रूप आपण सर्वजण जाणतोच. हे रूप नृत्याचे प्रतीक आहे.
*तिरुनलवेली ह्या जागी भगवान शंकराने आपल्या नृत्यकलेचे दर्शन घडविले होते असे म्हणतात. त्या अनुषंगाने ह्या शहराला एक अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते.*
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/ ❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा ❍
----------------------------------------
तामिळ भाषेत नेल म्हणजे भाताचे शेत आणि वेली म्हणजे कुंपण. तसे आपण भगवान शंकराला डीस्ट्रॉयर मानतो परंतु तिरुनलवेली येथे ह्या देवाला भाताच्या शेती चे संरक्षक मानतात.
तज्ज्ञांच्या मते, नेलाई यप्परचे शंकराचे मंदिर पांडवांनी बांधले होते व तिथून पुढे ह्या मंदिराचा जीर्णोद्धार होत गेला.
इसवी सणाच्या ७०० व्या शतकात महाराजा निद्रासीर नेदुमारन ह्याने ह्या मंदिरातील ह्या अद्भुत खांब बांधले. ह्या खांबावर थाप मारली असता संगीत सूर ऐकू येतात.
हे मंदिर १४ एकर भागात पसरले असून ह्या मंदिरात तब्बल १६१ खांब आहेत.
थिरूनलवेलीचे मंदिर
तमिळनाडू मध्ये तिरुनलवेली जवळ नेलाइयप्पर येथे शंकराचे मंदिर आहे. हे मंदिर थाम्रपर्णी नदीच्या काठावर आहे. ह्या मंदिरातल्या खांबांमधून सांगीतिक ध्वनी येतो.
होय, आपण जे वाचले ते खरे आहे. प्राचीन काळी अशा प्रकारचे काही दगड होते जे ह्या मंदिराच्या खांबांमध्ये वापरले आहेत.
तिरुनलवेली ह्या जागी च शंकराचा आणि पार्वती चा विवाह झाला होता आणि स्वतः भावानं विष्णू ह्या वेळी उपस्थित होते असे पुराणात सांगितले आहे
*ह्या संदर्भात इंडिया डेली वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, प्राचीन काळी ३ प्रकारचे दगड वापरले जायचे. श्रुती पिलर, गाणं थुंगल आणि लय थुंगल.*
यापैकी श्रुती आणि लय थुंगल चा वापर ह्या शंकराच्या मंदिरात झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे एक खांबावर थाप मारून आलेला भ्रमणध्वनी दुसऱ्या खांबावर पडून त्याच्या प्रतिध्वनीतून सूर ऐकू येतात.
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, ह्या खांबावर थाप मारून मूळ सप्तसुर निर्माण होतात. असे हे एकूण १६१ म्युझिकल खांब आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल, ह्यातील ४८ खांब एकाच मोठ्या शीळेतून कोरलेले आहेत.
*शिल्पशास्त्रानुसार, हे दगड तीन विभागात मोडतात मस्कुलाईन, फेमिनाईन आणि न्यूट्रल. तीन ही प्रकारचे दगड वेगवेगळे आवाज निर्माण करतात.*
देवाच्या मूर्तीला मस्कुलाईन दगड तर देवीच्या मूर्तीला फेमिनाईन दगड वापरले जातात असे शिल्प शास्त्रातील तज्ञ सांगतात.
अशाच प्रकारचे दगड हे तंजावर जवळील ऐरावतेश्वर मंदिरात वस्परले आहेत. इथल्या पायर्यांवर पाय दिला की सांगीतिक ध्वनी येतो. मदुराई च्या मीनाक्षी मंदिरात ही काही म्युझिकल दगड असलेले शिल्प आहेत.
भगवान शंकर म्हणले की गूढ असे काहीतरी जाणवल्या शिवाय राहत नाही. हे मंदिर अद्भुत आहे यात शंकाच नाही.
भारतीय शिल्पशास्त्र, स्थापत्यशास्त्र किती प्रगत होते याचीच प्रचिती अशा मंदिरांविषयी वाचलं की पुन्हा पुन्हा येते. आज अनेक मंदिरांवर संशोधन चालू आहे. काळाच्या ओघात आपल्याला बऱ्याच गोष्टी सापडतील यात शंका नाही.
तोपर्यंत मात्र भारतीय पर्यटनाची आवड असणाऱ्या प्रत्येकाने एकदातरी याठिकाणी जाऊन हा आविष्कार बघायलाच हवा.
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 9011714634 𝐕𝐢𝐤𝐢 ✺
❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
----------------------------------------