‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास मिळते शांत झोप; रोगप्रतिकारक शक्तीही वाढते…

🟣 या’ पदार्थांचे सेवन केल्यास मिळते शांत झोप; रोगप्रतिकारक शक्तीही वाढते…🟣

-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍  
----------------------------------------                             
           दिनांक - १५ सप्टेंबर २०२०
----------------------------------------
निरोगी राहण्यासाठी आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पुरेशी आणि शांत झोप गरजेची आहे. कोरोना संकटातही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पुरेशी झोप घेण्याची सूचना करण्यात आली आहे. आरोग्य चांगले राहण्यासाठी आपल्याला 8 ते 9 तासांची झोप गरजेची असते. मात्र, काहीजणांना रात्री शांत झोप येत नाही किंवा अनेकदा जाग येते. काहीजणांना भूक लागल्याने रात्री उठावे लागते. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे झोपण्यापूर्वी काही पदार्थांचे सेवन केल्यास शांत झोप येते आणि शरीराची रोगप्रतिकार शक्तीही वाढते.
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/   *❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा ❍*
----------------------------------------
बदाम शरीरासाठी उपयुक्त असल्याचे सगळ्यांना माहित आहे. त्यात शरीराला आवश्यक पोषक घटक असतात. त्यामुळे बदामाच्या सेवनाने अनेक रोगांपासून शरीराचे रक्षण होते. रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे सेवन केल्यास शांत झोप येते. बदामात मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठ वडगावची पोस्ट त्यामुळे शांत आणि पुरेशी झोप येण्यास मदत होते. चेरीचा ज्यूसही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात मॅग्नेशियम आणि फॉस्फोरस असते. चेरीच्या ज्यूसमध्ये अॅण्टीऑक्सीडंट, अॅन्थोकायनिन घटक असतात. त्यामुळे झोपबाबतची कोणतीही समस्या असल्यास ती दूर करण्यासाठी चेरीचा ज्यूस फायदेशीर ठरतो. तसेच ओमेगा 3 आणि विटामिन डी असणाऱ्या माशांच्या सेवनानेही झोपेबाबतच्या समस्या कमी होतात.
डेंग्यु किंवा तापामुळे अशक्तपणा आल्यास किवी खाण्याचा सल्ला देण्यात येतो. शरीराचा थकवा कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच किवीमुळे शरीराला आलेली सूज आणि शरीरातील कोलेस्टेरॉलही कमी होण्यास मदत होते. शरीराची झीज भरून निघत असल्याने आणि थकवा दूर होत असल्याने झोपण्यापूर्वी किवीचे फळ खाल्यास शांत झोप येते. किवीमुळे सेरोटोनिन हर्मोन्समध्ये वाढ होते. हे हार्मोन्स चांगली झोप येण्यासाठी महत्वाचे असतात. अक्रोडमध्ये फायबरसह 19 प्रकारचे पोषक घटक असतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. अक्रोडमधील फॅटी अॅसिडमुळे शांत झोप येते. तसेच झोपेबाबतच्या समस्या दूर होतात. प्रत्येकाच्या आहारात भाताचा समावेश असतो. दररोज झोपण्यापूर्वी योग्य प्रमाणात भाताचे सेवन केल्यास पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे भूक लागून रात्री जाग येत नाही. त्यामुळे शरीराला पुरेशी झोप मिळते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश केल्यास झोपेच्या समस्या दूर होण्यास मदत होते. या पदार्थांचे सेवन करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. 
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑  9011714634  𝐕𝐢𝐤𝐢 ✺
                  ❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
----------------------------------------
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने