🟣‘मांडूळ साप’ 50 लाखापर्यंत का विकला जातो? जाणून घ्या, काय आहे कारण…🟣
-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍
❍ दिनांक - ११ सप्टेंबर २०२०
----------------------------------------
‘मांडूळ’ला इंग्रजीमध्ये ‘रेड सँड बोआ’ असे म्हणतात. मांडूळ सापाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. मऊ जमिनीत राहणार हा साप कोरड्या जागी राहण्यास पसंती दर्शवतो. या सापाचे तोंड व शेपटी दिसायला साधारण सारखीच असते. मग या सापाची किंमत इतकी कशी? असा प्रश्न अनेकांना पडतो. आज आम्ही तुम्हाला याबद्दलच माहिती सांगणार आहोत.
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/ *❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा ❍
----------------------------------------
मांडूळ शेतकर्यांचा मित्र आहे. गुप्तधनाचा शोधक असल्याच्या अंधश्रद्धेपोटी व इतर गैरसमजुतींमुळे ‘मांडूळ’ या बिनविषारी सापाची जगभरात तस्करी सुरू आहे. गेल्या काही वर्षांत या सापाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याने त्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षात राज्यभरात मांडुळाच्या तस्करीची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठ वडगावची पोस्ट जादूटोण्यासाठी मांडूळ सापाला प्रचंड मागणी आहे. हा साप मिळावा म्हणून काही तांत्रिक – मांत्रिक त्याच्या सतत शोधात असतात. काही वेळा समोरची व्यक्ती सांगेल त्या पैशांना तो साप विकत घेतला जातो. सापाला दोन तोंड असल्याच्या गैरसमजुतीमुळे त्याच्याविषयी अनेक अंधश्रद्धा पसरल्या आहेत. तो दोन्ही बाजूंनी चालू शकतो. अथवा हा साप उन्हात धरल्यावर त्याची सावली पडत नाही किंवा त्याला आरशासमोर धरलं तर त्याचं प्रतिबिंब आरशात दिसत नाही. या सापाची पूजा केली की पैशांचा पाऊस पडतो, अशा अनेक समजुती आहेत. यामुळे या सापाची किंमत लाखांमध्ये आहे. कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना वैष्णवी कोंडेकर यांनी ही माहिती दिली
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 9011714634 𝐕𝐢𝐤𝐢 ✺
❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
----------------------------------------