🟣गुड न्यूज! पृथ्वीतलावरून लुप्त झालेल्या उंदराएवढ्या प्रजातीचा ‘हत्ती’ पुन्हा आढळला🟣
-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍
----------------------------------------
❍ दिनांक - १९ ऑगस्ट २०२०
----------------------------------------
हत्ती म्हटले की धिप्पाड शरीर, लांब सोंड आणि सुपा एवढे कान असे चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. मात्र आफ्रिकन देश जीबुतीमध्ये जवळपास 50 वर्षांपूर्वी लुप्त पावलेल्या उंदराएवढ्या प्रजातीचा ‘हत्ती’ (Elephant Shrews) पुन्हा आढळला आहे. हा छोटासा जीव आकाराने भलेही उंदराएवढा असला तरी हत्तीच्या प्रजातीमधील हा सर्वात दुर्मिळ प्राणी आहे. येथील स्थानिक नोंदीनुसार 1970 च्या दशकात सर्वात शेवटी हा जीव दिसला होता. मात्र आता 50 वर्षांनंतर हा जीव पुन्हा आढळल्याने संशोधकांमध्ये पुन्हा उत्साहाचे वातावरण आहे.
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/ *❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा ❍
----------------------------------------
उंदराएवढ्या प्रजातीच्या या ‘हत्ती’ला सेंगी (Sengis) या नावाने देखील ओळखले जाते. या प्राण्यांचा संबंध आफ्रिकेत आढळणाऱ्या Aardvarks (डुकरासारखा प्राणी) या प्राण्याशी आहे. या प्राण्याला एक मोठे नाक असते आणि याचा वापर तो किडे खाण्यासाठी करतो. संपूर्ण जगात याच्या 20 प्रजाती असून हा जीव फक्त सोमालियात आढळतो असा अंदाज असल्याने याला सोमाली सेंगी असेही म्हटले जाते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठ वडगावची पोस्ट दरम्यान, आफ्रिकन देश जीबुतीमध्ये आढळलेल्या या उंदराएवढ्या हत्तीची ओळख अमेरिकेच्या ड्युक विद्यापीठाचे संशोधक स्टीव्हन हेरिटेज यांनी पटवली आहे. हा जीव पुन्हा आढळक्याने आम्ही अत्यंत रोमांचित झालो आहोत, असे ते ‘बीबीसी’शी बोलताना म्हणाले. तसेच जीबुतीमध्ये देखील हा जीव आढळतो याबाबत आम्हाला माहिती नव्हती. मात्र आम्ही उंदराएवढ्या हत्तीची शेपूट आणि नाक पाहिले तेव्हा आम्हाला विश्वास बसला नाही, असेही ते म्हणाले. मात्र जीबुतीमधील लोकांनी हा जीव याआधीही दिसल्याचे सांगितले. परंतु हा लुप्त झालेला प्राणी आहे याबाबत माहिती नसल्याचेही नागरिकांनी सांगितले.
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 9011714634 𝐕𝐢𝐤𝐢 ✺
❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍