🟣डास माणसाचं रक्त का पितात?
-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍
----------------------------------------
❍ दिनांक - ३० ऑगस्ट २०२०
----------------------------------------
डास तुमचं रक्त का पितात? त्यांना रक्त पिण्याची सवय कशी लागली? या प्रश्नांचं उत्तर वैज्ञानिकांनी शोधून काढलं आहे. मात्र, वैज्ञानिकांनी सांगितलेलं कारण जाणून तुम्ही हैराण व्हाल. कारण जगाच्या सुरुवातीला डासांना रक्त पिण्याची सवय नव्हती. हा बदल त्यांच्यात हळू झाला.
डासांनी माणसांचे आणि प्राण्यांचे रक्त प्यायला सुरूवात केली, कारण ते कोरड्या प्रदेशात राहात होते. जेव्हा हवामान कोरडे असते आणि मच्छरांना आपल्या प्रजननासाठी पाणी मिळत नाही, तेव्हा ते माणसांचे आणि प्राण्यांचे रक्त पितात.
न्यू जर्सी येथील प्रिंसटन युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी काही दिवसांपूर्वी आफ्रिकेतील एडीस एजिप्टी डासांचे अध्ययन केले होते. याच डासांपासून झिका व्हायरस पसरला होता. डेंगू आणि पीतज्वरदेखील याच डासांमुळे होतो.
न्यू सायंटिस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार, आफ्रिकेच्या डासांमध्ये एडीस एजिप्ट डासांच्या अनेक प्रजाती आहेत. मात्र, या सर्वच प्रजातींचे डास रक्त पीत नाहीत. ते इतर गोष्टी खाऊन-पिऊन जगतात.
प्रिन्सटन युनिव्हर्सिटीचे संशोधक नोआह रोज यांनी या रिपोर्टमध्ये दावा केला होता की, अजूनपर्यंत कुणीही विविध प्रजातींच्या डासांच्या खाण्या-पिण्यासंदर्भात संशोधन केलेले नाही. आम्ही आफ्रिकेच्या सब-सहारन विभागातील 27 ठिकाणांवरून एडीस एजिप्ट डासांची अंडी घेतली. या अंड्यांतून डासांना बाहेर काढले. यानंतर त्यांना माणूस आणि इतर जीव असलेल्या गिनी पिग सारख्या लॅबमध्ये बंद डब्यात सोडले. यामागचा हेतू, त्यांचा रक्त पिण्याचा पॅटर्न समजणे, असा होता. यात एडीस एजिप्ट डासांचे वेगवेगळ्या प्रजातीच्या डासांपेक्षा खाणे-पिणे वेगळे असल्याचे दिसून आले.
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/ *❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा ❍
----------------------------------------
नोआह यांचे म्हणणे होते, की यावरून सर्वच डास रक्त पितात, हे साफ खोटे ठरले आहे. ज्या भागांत दुष्काळ आणि गरमी अधिक असते आणि पाण्याची कमतरता असते, अशा भागांत डासांना प्रजननासाठी ओलाव्याची गरज भासते. पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी मग ते माणसांचे आणि इतर प्राण्यांचे रक्त पिण्यास सुरूवात करतात.
डासांमध्ये हा बदल हजारो वर्षांपूर्वीच झाला आहे. खरेतर, वाढत्या शहरांमुळे पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने. एडीस एजिप्ट डासांना माणसाच्या रक्ताची गरज भासू लागली.
जेथे माणसं पाणी जमा करतात, तेथे अॅनोफिलीस प्रजातीच्या डासांना (या डासांपासून मलेरिया होतो.) काहीही अडचण नसते. ते आपले प्रजनन कूलर, रिकामे नारळ आणि टायर आदी ठिकाणी करतात. मात्र पाण्याची कमतरता भासू लागली, की ते लगेचच माणसांचे अथवा इतर प्राण्याचे रक्त पिण्यासाठी हल्ला करतात.
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 9011714634 𝐕𝐢𝐤𝐢 ✺
❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
----------------------------------------