🐢 आश्चर्य! दुर्मिळ सोनेरी कासव आढळला; विष्णूचा अवतार मानून लोकांची दर्शनासाठी रांग 🐢
-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍
----------------------------------------
दिनांक - २० ऑगस्ट २०२०
----------------------------------------
सध्या सोशल मीडियावर एका सोनेरी कासवाचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. नेपाळच्या धनुषा जिल्ह्यात दुर्मिळ कासव आढळला आहे. त्याचा रंग सोनेरी असून या कासवाला पाहण्यासाठी अनेक जण रांगा लावत आहेत. मिथिला वाइल्डलाइफ ट्रस्टने हा कासव भारतीय ल्पॅप कासव जातीचा असल्याचं म्हटलं आहे. या कासवाचा रंग सोन्यासारखा असल्याने अनेकांना याला विष्णूचा अवतार असल्याचं म्हटल्याने लोकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/ *❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा ❍
----------------------------------------
वन्यजीव तज्ज्ञ कमल देवकोटा म्हणाले की, या कासवाचं नेपाळच्या धार्मिक आणि सांस्कृतिक विशेष महत्त्व आहे. काही लोकांचे म्हणणं आहे की, भगवान विष्णूने पृथ्वीला वाचवण्यासाठी कासवाच्या अवतारात जन्म घेतला आहे. हिंदू मान्यतेनुसार कासवाच्या वरच्या बाजूला आकाश आणि खालच्या बाजूला पृथ्वी मानली जाते. तर तज्ज्ञांच्या मते, जिन्समधील बदलांमुळे कासवाचा रंग असा झाला आहे. याला क्रोमॅटिक ल्यूसिजम म्हटलं जातं. ज्याच्यामुळे कासवाच्या वरच्या भागाचा रंग सोनेरी होतो.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठ वडगावची पोस्ट नेपाळमध्ये आतापर्यंत ५ प्रकारचे कासव आढळले आहेत. पण सोनेरी रंगाचा कासव पहिल्यांदाच आढळला आहे. ही आमच्यासाठी असामान्य शोध आहे, हा कासव पाहण्यासाठी फार दूरहून लोक याठिकाणी येत आहेत. धनुषा नगरपालिका भागात हा कासव आढळून आला आहे. धनुषधाम संरक्षित वनातील अधिकारी चंद्रदीप सदा यांनी या कासवाला वाचवलं आहे.
https://m.lokmat.com/jarahatke/rare-golden-turtle-found-nepal-first-time-ever-a629/
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 9011714634 𝐕𝐢𝐤𝐢 ✺
❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍