🟣 एक लिटर दुधाची किंमत 7 हजार रुपये 🟣
-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍
----------------------------------------
❍ दिनांक - २३ ऑगस्ट २०२०
----------------------------------------
दूध हा रोजच्या जीवनातील अविभाज्य घटक. गाय, म्हैस, बकरी यांच्या दुधाबाबत आपण ऐकले असेल. आपल्याकडे गाईचे दूध 40 ते 50 रुपये लिटर आणि म्हशीचे 60 ते 70 रुपये लिटर मिळते. स्थानानुसार या किंमती कमी जास्त होऊ शकतात. मात्र देशात एक अशी डेअरी सुरू होणार आहे जिथे 1 लिटर दुधासाठी तब्बल 7 हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
आश्चर्य वाटले ना. पण हे खरे आहे. हरयाणा मधील हिसार येथे लवकरच गाढविणीच्या दुधाची डेआरी सुरू होणार आहे. विशेष म्हणजे देशातील अशी ही पहिलीच डेअरी असणार आहे, जिथे गाढविणीचे दूध मिळेल. मात्र यासाठी खिसा चांगलाच मोकळा करावा लागणार असून एक लिटर दुधाची किंमत 7 हजार रुपये असणार आहे. गाढविणीचे दूध रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर असल्याचे समोर आले आहे. तसेच यापासून अनेक सौंदर्य प्रसाधने देखील तयार होतात.
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/ *❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा ❍
----------------------------------------
हिसारमध्ये हलारी प्रजातीचा गाढविणीपासून मिळणाऱ्या दुधाची डेअरी सुरू होणार आहे. मुख्यत्वे गुजरातमध्ये आढळणाऱ्या या प्रजातीची 10 हजार गाढविणी मागवण्यात आल्या आहेत. हलारी जातीच्या गाढविणीच्या दुधात अनेक औषधी गुणधर्म आढळतात. कर्करोग, जाडेपणा आणि अनेक प्रकारची ऍलर्जी यावर हे दूध रामबाण असल्याचे समोर आले आहे. अनेकदा गाय किंवा म्हशीच्या दुधामुळे लहान मुलांना ऍलर्जी होते. मात्र हलारी जातीच्या गाढविणीच्या दुधामुळे ऍलर्जी होत नाही.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठ वडगावची पोस्ट तसेच यात अनेक प्रकारचे अँटी ऑक्सिडेंट, अँटीएजीन तत्व आढळत असल्याने गंभीर आजारांचा सामना करण्याची शक्ती मिळते.
दरम्यान, बाजारात गाढविणीच्या दुधाला 2 हजार ते 7 हजार रुपये लिटर पर्यंत भाव मिळतो. यापासून अनेक प्रकारची सौंदर्य प्रसाधने तयार केली जातात आणि बाजारात त्याला हजारांचा दर मिळतो. तसेच यापासून साबण, लिब बाम, बॉडी लोशन यासारख्या गोष्टीही बनवल्या जातात.
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 9011714634 𝐕𝐢𝐤𝐢 ✺
*_❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍