🟣 हिमालयातील या भाजीची किंमत 30 हजार रुपये किलो, विदेशात प्रचंड मागणी🟣
-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍
----------------------------------------
❍ दिनांक - २७ ऑगस्ट २०२०
----------------------------------------
भाज्या, मसाले यांच्यासाठी हिंदुस्थान प्रसिद्ध आहे. मात्र हिंदुस्थानातील एक भाजी अशी आहे ज्या भाजीला विदेशात मोठी मागणी आहे आहे. विशेष म्हणजे या भाजीचा दर 30 हजार रुपये किलो इतका आहे.
हिंदुस्थानातील सर्वात महाग भाजीपाला हिमालयातून येतो. या भाजीपाला जगभरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. 30 हजार रुपये दराने मिळणाऱ्या या या भाजीचे नाव गुच्छी असे आहे. ही भाजी शिजवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. मात्र तरी या भाजीला मोठी मागणी आहे कारण ही भाजी अत्यंत गुणकारी आणि पौष्टिक असून हृदयरोगाचा त्रास होत नाही. याशिवाय मल्टी-व्हिटॅमिनचा हा नैसर्गिक स्त्रोत आहे.
या भाजीचे नाव गुच्छी आहे. हिमालयात आढळणारी वन्य मशरूमची ही एक प्रजाती आहे. बाजारात त्याची किंमत 25 ते 30 हजार रुपये किलो आहे. ही भाजी बनवण्यासाठी सुका मेवा, भाज्या आणि शुद्ध तूपाची आवश्यकता असते. ही हिंदुस्थान मिळणारी अत्यंत दुर्मिळ भाजी आहे, ज्याची विदेशातही मागणी आहे. लोक विनोदाने म्हणतात की, जर तुम्हाला गुच्छीची भाजी खायची इच्छा असेल तर तुम्हाला बँकेकडून कर्ज घ्यावे लागेल.
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/ ❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा ❍
----------------------------------------
अत्यंत चविष्ट अशा या भाजीच्या नियमित वापरामुळे हृदयरोग होत नाहीत कारण यात अनेक औषधी गुण आहेत. हृदयरोगामुळे पीडित व्यक्तींनी दररोज थोड्या प्रमाणात या भाजीचे सेवन केल्यास त्याचा फायदा होतो, असे सांगण्यात येते. ही भाजी हिमालय पर्वतातून आणून कोरडी केली जाते. यानंतर ती बाजारात आणली जाते. यात देखील उत्तम, मध्यम, कनिष्ठ असे प्रकार येतात.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठ वडगावची पोस्ट गुच्छीचे वैज्ञानिक नाव मार्क्युला एस्केल्पेन्टा आहे. याला मोरेल्स देखील म्हणतात. त्याला स्पंज मशरूम देखील म्हणतात. ही भाजी मशरूमच्या प्रजाती, मोर्चेला प्रकारातील आहे. ही मुख्यतः हिमाचल प्रदेश, जम्मू आणि कश्मीरच्या पर्वतांवर पिकविली जाते. बर्याच वेळा पावसाळ्यात ते स्वतःच वाढतात. परंतु चांगला मोबदला पाहिजे असल्यास या भाजीवर बरेच महिने मोठी मेहनत घ्यावी लागते. कारण डोंगरावर चढून, जीव धोक्यात घालून ही भाजी आणावी लागत असल्याने तिचे मुल्य वाढते.
गुच्छी पावसात साठवून ठेवली जाते. मग हिवाळ्यात त्याचा अधिक वापर केला जातो. अमेरिकन, युरोप, फ्रान्स, इटली आणि स्वित्झर्लंडमधील लोकांना कुल्लू मधील गुच्छी खूप आवडते. गुच्छीत पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्वे बी, डी, सी आणि के असतात. या भाजीत जास्त पोषक घटक असतात.
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 9011714634 𝐕𝐢𝐤𝐢 ✺
❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍